मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने मानाचा तुरा रोवला. या चित्रपटासह चित्रपटातील पात्रही विशेष गाजली. केवळ परशा आणि आर्चीच नाही, तर परशाचा मित्र लंगड्यानेही प्रेक्षकांवर आपली छाप सोडली.
सोशल मीडियात तानाजी गळगुंडेच्या न्यूड फोटोशूटची एकच चर्चा
प्रेक्षक अजूनही सैराटमधील परश्याचा मित्र लंगड्याला विसरले नाहीत. चित्रपटातील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला. सैराट चित्रपटात दिव्यांग मुलाचे पात्र साकारलेला तानाजी गळगुंडे त्याच्या खऱ्या आयुष्यात दिव्यांगच आहे. पण तानाजीने त्याच्या आयुष्यावर याचा काहीच परिणाम होऊ दिला नाही. उलट त्यावर मात करत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
सध्या सैराट फेम लंगड्या म्हणजेच तानाजी आपल्या आगळ्या वेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तानाजीच्या न्यूड फोटोशूटच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. माझे पाय तर योग्य रचनेत नाहीत, पण माझे संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!