अमित ठाकरेंकडून स्वप्नील लोणकरच्या पालकांना आर्थिक मदत


पुणे : आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांत्वनपर भेट घेतली. स्वप्नीलच्या आई वडिलांना यावेळी दोन लाखांचा चेक देत अमित ठाकरे यांनी माझा मोबाईल नंबर देऊन जातो, कधीही काही वाटले आणि काही मदत लागली तर फोन करा. आमचा पक्ष तुमच्याशी पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. त्यांनंतर माध्यमांशी बोलतांना सरकार झोपले आह का? हे विचारले पाहिजे लवकर भरती करा, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.

दुसरीकडे अशा भेटू देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही भरती लवकर करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी लागू द्या हीच आमच्या स्वप्नीलसाठी श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईवडिलांनी दिली आहे. सरकार कशाची वाट बघत आहे? सरकार झोपले आहे का हे विचारले पाहिजे? आमच्या पद्धतीने आम्ही मदत करत असल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.

अशा भेटू देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर आता आयुष्यभर आम्हाला रडतखडत जगावे लागेल. आम्हाला भेटण्यापेक्षा भरती करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्या. आम्हाला आमचा मुलगा नोकरीला लागला असे वाटेल. आमच्या मुलांचे बलिदान गेले, त्यामुळे आता सगळ्यांना जाग तरी आली.

दरवर्षी भरती निघते, जागा असते म्हणून निघते ना? असा सवाल स्वप्नीलच्या आईने विचारला आहे. फक्त पैसे गोळा करण्यासाठी करतात का ? आता जर स्वप्नीलला न्याय द्यायचा असेल तर भरती करा, अशी मागणी छाया लोणकर यांनी केली आहे. अनेक स्वप्नील सरकारने वाचवले तर बरे आहे आणि भरती नाही झाली तर असे अनेक स्वप्नील जातील.