गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर 72 स्पेशल गाड्या; बुकिंग गुरुवारपासून सुरू


मुंबई : कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या असून संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे आरक्षण गुरुवार 8 जुलैपासून सुरु होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात येणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार असून या ट्रेन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.

अशा प्रकारे आहे गणपती स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (36 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01227 – ही ट्रेन दररोज 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान सीएसएमटीहून रात्री 12.20 वा. सुटून सावंतवाडी रोडला दुपारी 2.00 वा. पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01228 – ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दु. 2.40 वा. सुटेल आणि सीएसएमटीला पहाटे 4.35 वा. पोहोचेल.

याठिकाणी थांबेल ट्रेन – दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (10 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01229 – ही ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून 2 वेळा म्हणजेच सोमवार आणि शुक्रवार सीएसएमटीहून दु 1.10 वा. सुटून रत्नागिरीला रात्री 10.35 वा. पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01230 – ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून 2 वेळा म्हणजेच रविवार आणि गुरुवार रत्नागिरीहून रात्री 11.30 वा. सुटून सीएसएमटीला सकाळी 8.20 वा. पोहोचेल.

याठिकाणी थांबेल ट्रेन – दादर, ठाणे, (केवळ ट्रेन क्र. 01229) पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,
चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड

पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रैसाप्ताहिक (16 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01231 – ही ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि शनिवार पनवेलहून सकाळी 8.00 वा. सुटून सावंतवाडीला रात्री 8.00 वा.पोहचेल.
  • ट्रेन क्र. 01232 – ही परतीची ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि शनिवार सावंतवाडीहून रात्री 8.45 वा. सुटून पनवेलला सकाळी 7.10 मिनिटांनी पोहचेल.

याठिकाणी थांबेल ट्रेन – रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक स्पेशल (10 फेऱ्या)

  • ट्रेन क्र.01233- ही ट्रेन 9 ते 23 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच गुरुवार आणि रविवार पनवेलहून सकाळी 8.00 वा. सुटून रत्नागिरीला दुपारी 3.40 वा. पोहोचेल.
  • ट्रेन क्र. 01234 – ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच सोमवारी आणि शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री 11.30 वा. सुटून पनवेलला सकाळी 6.00 वा. पोहचेल.

याठिकाणी थांबेल ट्रेन – रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

या सर्व गाडय़ांच्या डब्यांची स्थिती – एक एसी 2 टिअर कम एसी 3 टिअर, चार एसी 3 टिअर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग अशी असेल.