याच नावाने येणार आयफोन नवी सिरीज

आयफोन लाईन अप सिरीजची घोषणा होण्यास अद्याप काही महिने बाकी असतानाच आयफोन १३ ची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु आहे. नवा आयफोन नक्की कुठल्या नावाने येणार याची चर्चा सुद्धा बरीच रंगली आहे. नवी सिरीज आयफोन १३ नावाने येणार नाही असाही अंदाज काही जाणकार व्यक्त करत होते. १३ हा नंबर पाश्चात्य देशात अशुभ मानला जातो म्हणून आयफोन १३ नावाने येणार नाही असे सांगितले जात होते. काही जाणकारांच्या मते नवी सिरीज आयफोन १२३ नावाने येईल असेही म्हटले जात होते.

पण आता नव्या आयफोन सिरीज मध्ये नवे आयफोन १३ नावानेच येणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. सप्लायचेन व नाईन टू फाईव्ह मॅक रिपोर्ट नुसार २०२१ आयफोन १३ नावानेच लाँच केले जातील. आयफोन १३ ची मोठी ऑर्डर फॉक्सकॉनला दिली जाईल तर आयफोन १३ मिनीचे असेम्ब्लिंग पेगाट्रॉन कडे असेल.

नव्या आयफोन बाबत सतत ज्या अफवा येत आहेत त्यातील एक आहे या फोनला १२० एचझेड प्रमोशन डिस्प्ले असेल. हा ऑलवेज ऑन डिस्प्ले असून त्यात वेळ, बॅटरी लेव्हल आणि इनकमिंग नोटीफिकेशन दिसतील. हा फोन रोझ पिंक आणि ब्लॅक कलर व्हेरीयंट मध्ये असेल असेही सांगितले जात आहे.