मुंबई : राज्यातील 18 हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेस्टा संघटनेकडून फी मध्ये 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 18 हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, फी मध्ये 25 टक्के कपात
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर 25 टक्के शुल्ककपात केली असून हा निर्णय शाळांच्या मेस्टा या संस्थेने जाहीर केला आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अनेक पालकांनी शुल्क न भरल्याने शाळा चालवणे अवघड झाले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने 15 टक्के फी करण्याचे सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे. या लाभ राज्यातील 18 हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.