अमेरिका झाली २४५ वर्षांची, या आहेत खास गोष्टी

जगातील महासत्ता अशी ओळख मिळविलेली अमेरिका ४ जुलै २०२१ रोजी वयाची २४५ वर्षे पूर्ण करून २४६ व्या वर्षात गेली. संयुक्त राज्य अमेरिका डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स डे म्हणून ओळखला जातो. ४ जुलै १७७६ मध्ये कॉन्टीनेंटल कॉंग्रेसने १३ अमेरिकी उपनिवेश ब्रिटनचा राजा किंग जॉर्ज तृतीय यांच्या कडून स्वातंत्र आणि एकजूट झाल्याचे जाहीर केले पण त्याची प्रत्यक्ष घोषणा ४ जुलै रोजी केली गेली होती.

अमेरिकेच्या या काळात काही खास विशेष बाबी जाणून घेणे मनोरंजक आहे. १९ व्या शतकाच्या सुरवातीला रशियाच्या ताब्यात असलेला अलास्का हा सर्वात मोठा प्रदेश अमेरिकेने रशियाकडून १८ ऑक्टोबर १८६७ मध्ये ७२ लाख डॉलर्सना विकत घेतला होता. आजची त्याची किंमत आहे १३.३ कोटी डॉलर्स.

लोकशाहीचे नारे देणाऱ्या अमेरिकेचे प्रतिष्ठित व्हाईट हाउस बांधायची सुरवात १३ ऑक्टोबर १७७२ रोजी झाली आणि हे काम करणारे आफ्रिकी आणि अमेरिकी गुलाम होते. त्यावेळी त्याला प्रेसिडेंट पॅलेस म्हटले जात होते पण १८११ मध्ये या इमारतीला व्हाईट हाउस नाव दिले गेले. या इमारतीची जागा आणि डिझाईन जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले मात्र ते या इमारतीत कधीच राहिले नाहीत. १८८० मध्ये व्हाईट हाउस मध्ये राहायला आलेले पाहिले राष्ट्रपती होते जॉन अॅडम्स. १८१२ च्या युद्धात ब्रिटीश लष्कराने व्हाईट हाउसला आग लावली होती. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती जेम्स मेडिसन यांना व्हाईट हाउस मधून बाहेर पडावे लागले होते. १८१५ ते १७ या काळात व्हाईट हाउसचे पुनर्निर्माण केले गेले.

त्या काळात जगात अनेक ठिकाणी राजेशाही होत्या. आता अनेक देशात प्रजासत्ताक आहे. मात्र आपल्या देशप्रमुखाला राष्ट्रपती म्हणणारी पहिली अमेरिकाच होती. चंद्रावर पाउल टाकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. आणि विशेष म्हणजे अमेरिकेची भाषा इंग्लिश मानली जात असली तरी ती राष्ट्राची अधिकृत भाषा नाही. अमेरिकेने अजून त्यांची अधिकृत भाषा कोणती याची घोषणाच केलेली नाही.

ऑलिम्पिक्स मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके अमेरिकेने मिळविली असून ही संख्या आहे ११२७. आजपर्यंत अमेरिकेने आठ वेळा ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमान पद भूषविले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाबाबत असे सांगतात की १९५८ मध्ये १७ वर्षाच्या रोबर्ट हेफ या मुलाने शाळेचा प्रोजेक्ट म्हणून ५० तारे असलेला हा झेंडा बनविला होता. त्याबद्दल त्याला बी ग्रेड दिली गेली होती. पण नंतर ती ए करण्यात आली. त्यापूर्वी अमेरिकेने १७७५ व १७७७ पर्यंत दोन झेंडे देशाचे प्रतिक म्हणून वापरले होते. पण १९६० मध्ये राष्ट्रपती आयसेन हॉवर यांनी रोबर्टने बनविलेला ५० तारे असलेला झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला.

पिझ्झा हा पदार्थ मुळचा इटालियन. १९ व्या शतकात हा पदार्थ इटलीयन प्रवाशांबरोबर अमेरिकेत आला आणि आता अमेरिकेत इतका लोकप्रिय आहे की, दरवर्षी अमेरिकन ३०० कोटी किमतीचे पिझा फस्त करतात.