सायबर हल्ल्यात १ हजार कंपन्यांना फटका

अमेरिकेतील आयटी कंपनी कासिया वर नुकत्याच झालेल्या रॅनसमवेअर हल्ल्याची तीव्रता आता लक्षात येऊ लागली आहे. या हल्ल्यामुळे कासियाच्या कार्पोरेट नेटवर्क व सॉफ्टवेअरचा वापर करणाऱ्या किमान १००० कंपन्या टार्गेट झाल्या आहेत असे समजते. हा हल्ला रशियन सायबर क्राईम ग्रुप आरएव्हिल ने केला असल्याचे उघड झाले आहे. कासिया सॉफ्टवेअर कंपनी ४० हजाराहून अधिक बिझिनेस हाउसना सेवा देते त्यातील किमान १ हजार कंपन्या या हल्ल्याची शिकार झाल्या असल्याची माहिती संशोधकानी शनिवारी दिली.

या हल्ल्यामुळे स्वीडनची सर्वात मोठी सुपरमार्केट चेन ‘कूप’ला त्यांची ८०० स्टोर्स बंद करावी लागली आहेत. अकौंट आणि चेकआउट अॅक्सेस करता येत नसल्याने कंपनीने स्टोर्स बाहेर बोर्ड लावून ग्राहकांना सायबर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी हन्ट्रेस लॅब या संदर्भात तपास करत आहे. स्वीडिश रेल्वे व अन्य एक मोठी फार्मसी चेनही या हल्ल्याची शिकार बनली आहे.

या हल्ल्यात इंस्क्रीप्शनच्या माध्यमातून कंपनीची डेटा सिस्टीमचे लॉक उघडले गेले आणि आता हल्लेखोर या कंपन्यांकडून खंडणीची मागणी करत आहेत असे समजते. आत्तापर्यंत ५० लाखाची खंडणी मागितली गेली असून हा सप्लायचेन रॅन्समेवर हल्ला म्हटला जात आहे. कासिया कंपनीने सर्व ग्राहकांना सर्व्हर बंद ठेवावा अश्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तपासाचे आदेश दिले असून नुकत्याच झालेल्या रशियाचे प्रमुख पुतीन यांच्या भेटीत सुद्धा या विषयी चिंता व्यक्त केली होती.