माहीने लग्नाच्या वाढदिवसाची साक्षीला दिली खास भेट

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या सहजीवनाला ४ जुलै रोजी ११ वर्षे झाली. त्यानिमित्ताने माहीने साक्षीला एक खास गिफ्ट दिली आहे. धोनी आणि साक्षी हे फेमस सेलेब्रिटी कपलच्या यादीत आहेत. ४ जुलै २०१० मध्ये माही आणि साक्षी यांचा विवाह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला होता. त्याला फक्त कुटुंबीय आणि निवडक नातेवाईक उपस्थित होते.

रविवारी साक्षीने एक फोटो शेअर करून धोनी कडून मिळालेल्या गिफ्टची माहिती दिली आहे. ही एक विंटेज कार आहे. फोटो खाली कॅप्शन मध्ये साक्षीने ‘अॅनीव्हर्सरी गिफ्ट साठी माहीला धन्यवाद दिले आहेत. तिने या बरोबर आणखीही काही फोटो शेअर केले आहेत.

आयपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्सतर्फे ही धोनीला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या गेल्या असून त्यात माही आणि साक्षी यांचा फोटो शेअर केला गेला आहे. त्याखाली टीमचा ‘किंग आणि क्वीन, हॅपी अॅनीव्हर्सरी’ असे लिहिले गेले आहे.