रेल्वेत स्टेशन मास्तरच्या 38 पदासाठी भरती


नवी दिल्ली : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये लवकरच एका पदासाठी भरती होणार आहे. ही भरती स्टेशन मास्तर पदासाठी होणार असून त्यासाठीची अधिसूचना पश्चिम रेल्वेने जारी केली आहे. त्यानुसार स्टेशन मास्तरच्या एकूण 38 जागांसाठी ही भरती होणार आहे. यात 18 जागा या अनारक्षित प्रवर्गासाठी आहेत, तर इतर 20 जागा या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 असणार आहे.

स्टेशन मास्तर – एकूण जागा 38
कोणासाठी किती जागा
अनारक्षित वर्ग (Open)- 18
एससी – 5
एसटी – 3
ओबीसी -12

शैक्षणिक पात्रता – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून डिग्रीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –
अनारक्षित श्रेणी – 18 ते 40 वर्षे
ओबीसी – 18 ते 43 वर्षे
एससी/एसटी – 18 ते 45 वर्षे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.