लहान मुलांएवढाच बायकांना त्रास देतात पतीदेव !


मुंबई : आपल्या आईला एखादे लहान मुले त्रास देतात हे आपल्यापैकी अनेकांना मान्य असेल पण आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की एखाद्या लहानमुलाप्रमाणे एखादा नवरा आपल्या बायकोला त्रास देत असतो तर तुमच्या पैकी कितीजणांचे उत्तर हो असेल. खरे नाही ना वाटत… पण हे काही आम्ही सांगत नाही तर एका सर्व्हेतून समोर आले आहे.

एखाद्या पत्नीला जर का तुमचा पती कुठलेही काम सांगितले किंवा कुठली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली, की ते टाळाटाळ करतात? लहान मुलांसारखे तुमचे पती हे वागतात, लहान मुलांप्रमाणे तुमचा तणाव वाढवतात, असे विचारले त्याचे उत्तर नक्कीच हो म्हणून असेल. या संदर्भातील सर्व्हे ‘टुडे डॉट कॉम’ या संकेतस्थळाने केला आहे.

संकेतस्थळाच्या सर्व्हेनुसार, लहान मुलांएवढेच टेंशन महिलांना त्यांचे पती देतात. विवाहित महिलांच्या जीवनातील अति ताणावर हा सर्व्हे करण्यात आला होता. जवळपास सात हजार महिलांची मते यामध्ये नमुद करण्यात आली. त्यांना यावेळी त्यांच्या जीवनातील तणाव, घरातील कामाचे वितरण आणि त्यांचे पती आणि मुलांसोबतचे जीवन यावर प्रश्न विचारण्यात आले.

या सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्यांपैकी 46 टक्के महिलांनी त्यांचे पती त्यांना मुलांपेक्षा जास्त टेंशन देत असल्याचा दावा केला. यामध्ये महिलांची तणावाची सरासरी पातळी ही 10 पैकी 8.5 टक्के असल्याचं समोर आले.

तुम्हाला तुमच्या पतीमुळे जर, तणाव जाणवत असेल, तर याबाबत तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी. तुमच्या आरोग्यावर अति तणावाचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याबाबत तुमच्या पतीसोबत चर्चा करा. घरातील सर्व कामे उदा. घरातील किराणा, भांडी घासणे, जेवण बनवणे, कपडे धुणे, मुलांना अभ्यासात मदत करणे आणि इतर घरगुती कामे वाटून घ्यायला हवी. शेअरिंग आणि केअरिंग, म्हणजेच प्रत्येक गोष्ट शेअर करणे आणि एकमेकांची काळजी घेणे हाच सुखी विवाहित आयुष्याचा मंत्र आहे.

एकट्या महिलेवर घरातील सर्व कामे आणि मुलांचा सांभाळ याची जबाबदारी असते, सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक चारपैकी एका महिलेने हे मान्य केले. तर अनेकांनी त्यांना त्यांच्या पतीकडून हवी ती मदत मिळत नसल्याची तक्रारही केली. तसेच, पतीचे काम वेळेवर झाले नाही तर ते लगेच तक्रार करत असल्याचेही अनेक महिलांनी सांगितले. तुमच्यापैकी अनेकांनाही असंच वाटत असेल. त्यातच ज्या महिला एकट्या आपल्या मुलांचा सांभाळ करतात. त्यांच्या तणावाची पातळी ही इतर महिलांपेक्षा जास्त असल्याचेही या सर्व्हेत दिसून आले.

Leave a Comment