आमीरशी विभक्त झाल्यानंतरही एवढ्या संपत्तीची मालकीण असणार किरण राव


किरण रावची केवळ आमीर खानची पत्नी एवढी ओळख नसून तिने देखील स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. किरण एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. आपल्या मेहनतीमुळेच किरण या खास ठिकाणी पोहोचली आहे. तिची कमाई देखील एखाद्या बड्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. बक्कळ कमाई करण्याबरोबरच किरण अनेक स्वयंसेवी संस्थांशीही संबंधित आहे. किरण राव यांचा नेट वर्थ, त्यांचे वय, करिअरची माहिती आणि वैयक्तिक जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी बरेच लोक सध्या इंटरनेटवर सर्च करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 20 मिलिअन डॉलर्स म्हणजेच जवळपास 146 करोड एवढी किरण राव यांची एकूण मालमत्ता आहे. किरण एक सर्वाधिक कमाई करणारी महिला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. आमीर खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याची एकूण मालमत्ता सुमारे 1434 कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी तब्बल 85 कोटी रुपये आकारतो.

किरणकडे स्वतःचे आलिशान घर आणि महागड्या गाड्या आहेत. पण, आपल्याकडे किती घर आहेत आणि किती वाहने आहेत, हे किरणने अद्याप कुठेही जाहीर केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार 2020मध्ये किरणची एकूण संपत्ती 20 दशलक्ष म्हणजेच 146 कोटी एवढी होती.

आमीर खान आणि किरण राव यांचे 2005मध्ये लग्न झाले. आता या दोघांनाही एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आझाद आहे. किरणच्या कामाविषयी बोलायचे तर ती एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू. या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सिक्रेट सुपरस्टार, पिपली लाइव्हसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. यासह तिने धोबी घाटचे दिग्दर्शनही केले आहे. किरण ही बॉलिवूड स्टार्स वाईफमधील सर्वात यशस्वी महिला आहे.