इन्स्टाग्राम रिच लिस्ट, विराट २० नंबरवर

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली त्याची स्टाईल, त्याची रेकॉर्ड आणि संपत्ती यामुळे नेहमीच चर्चेत असतो. विराट जाहिरातीतून अमाप पैसा कमावतो तसाच तो इन्स्टाग्राम पोस्ट मधून सुद्धा भरभक्कम कमाई करतो. विराट एका इन्स्टाग्राम पोस्ट साठी ५ कोटी रुपये घेतो असे सांगितले जाते.

इन्स्टाग्रामवर कुणाची कमाई किती या संदर्भात एक यादी दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. जगभरातील सेलेब्स मधील टॉप १०० चा त्यात समावेश असतो. Hopperha.com वेबसाईट ही यादी प्रसिद्ध करते तशी ती शुक्रवारी प्रसिद्ध केली गेली आहे. या यादीत काही भारतीयांचा समावेश आहे. यादीत पहिल्या नंबरवर पोर्तुगालचा क्रिस्तियानो रोनाल्डो आहे. विराट कोहली या यादीत २० नंबरवर असून बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा २७ व्या नंबरवर आहे. टॉप तीस मध्ये हे दोघेच भारतीय आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, अन्य सेलेब यांचा इन्स्टाग्रामवर किती प्रभाव आहे, प्रत्येक पोस्ट साठी ते किती पैसे घेतात या विषयी नेहमीच उत्सुकता असते. विराट या यादीत गतवर्षी २३ नंबरवर होता. तो एका पोस्ट साठी ५ कोटी घेतो तर प्रियांका एका पोस्ट साठी तीन कोटी घेते. रोनाल्डो प्रत्येक स्पॉन्सर पोस्ट साठी ११.९ कोटी घेतो. ड्वेन जॉन्सन आणि एरियन ग्रान्दे प्रत्येक पोस्ट साठी अनुक्रमे ११.३ आणि ११.२ कोटी घेतात.

या यादीत चार नंबर वर टीव्ही स्टार काईली जेनर आहे. त्यानंतर सेलेना गोमेझ, किम कार्दिशियान, लियोनेल मेस्सी आणि बेयोन्से यांचे नंबर आहेत.