बेजोस यांच्यावर मात करून व्हर्जिनचे रिचर्ड ब्राऊन घेणार अंतराळ झेप

अंतराळ यात्रेमध्ये गर्दीची झुंबड उडाल्याचे दृश्य सध्या दिसत आहे. चीन बिझिनेस टायकून सह अन्य अनेक या रेस मध्ये सामील आहेत. आणि नवनवी नावे सतत समोर येत आहेत. जेफ बेजोस त्यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड कॅपसुल मधून २० जुलै रोजी अंतराळ सफर करणार असल्याची घोषणा झाली असतानाच व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रान्सन यांनी गुरुवारी ११ जुलै रोजी ते अंतराळ सफरीवर रवाना होत असल्याची घोषणा केली आहे.

ब्रान्सन यांनी ११ जुलैच्या नव्या टेस्ट फ्लाईट मध्ये अन्य सहा लोकांसह ते उड्डाण करणार असल्याचे जाहीर केले असून हे उड्डाण न्यू मेक्सिको येथून होणार आहे. व्हर्जिन ही क्रू सह हे मिशन करणारी पहिली कंपनी आहे. त्यांच्या कंपनीची ही चौथी फ्लाईट आहे. ब्रान्सन म्हणतात, थोडे टेन्शन नक्कीच आहे. पण मी नेहमीच अंतराळ झेप घेण्याचे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण होणार आहे.

हे रॉकेट ८८ किमी उंचावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळ प्रवासात सध्या तीन कंपन्यामध्ये स्पर्धा आहे. त्यात व्हर्जिन, बेजोस यांची ब्ल्यू ओरिजिन आणि एलोन मस्क यांची स्टार कंपनी असून यात सध्या तरी व्हर्जिनने बाजी मारली आहे.