प्रिन्सेस डायनाच्या कारला मिळाली सव्वा कोटीची किंमत

ब्रिटन राजघराण्याची प्रिन्सेस ऑफ वेल्स आणि प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी दिवंगत डायना हिच्या फोर्ड एस्कॉर्ट कारची लिलावात विक्री करण्यात आली. या कारला ५० हजार पौड म्हणजे भारतीय रुपयात १ कोटी २५ लाख ८७ हजार ८१७ रुपये किंमत मिळाली. द. अमेरिकी म्युझियमने ही कार खरेदी केल्याचे जाहीर केले गेले आहे.

सिल्व्हर १.६ लिटर घिया सलून कार प्रिन्स चार्ल्स यांनी साखरपुड्याच्या वेळी डायनाला गिफ्ट दिली होती. १९८१ मध्ये चार्ल्स आणि डायना यांचा विवाह झाला होता. आणि १९९७ मध्ये प्रिन्सेस डायना यांना अपघाती मृत्यू आला होता. या कारला अजूनही ब्रिटीश नंबरप्लेट आहे. कारचा नंबर आहे डब्ल्यू ई डब्ल्यू २९७ डब्ल्यू. या कारला लिलावात ३० ते ४० हजार पौंड बोली लागेल अशी अपेक्षा होती.

१९८२ मध्ये सर्वप्रथम या कारचा लिलाव केला गेला होता. त्यावेळी एका अँटीक डीलरने ती ६ हजार पौंड देऊन खरेदी केली होती. नंतर एका टेलिफोन बोलीकर्ता ने ती ५२६४० पौंड मध्ये खरेदी केली होती. रिमन डॅन्सी ऑक्शनचे प्रमुख लुईस रोबर्ट म्हणाले अमेरिकी म्युझियमने ती खरेदी केल्यामुळे जागतिक स्तरावर या कार मध्ये लोकांचा रस वाढेल अशी अपेक्षा आहे.