फरहान अख्तरच्या आगामी ‘तूफान’चे रोमॅण्टिक पोस्टर तुमच्या भेटीला


पुन्हा एकदा स्पोर्ट्स ड्रामा ‘तूफान’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता फरहान अख्तर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटाचं रोमॅण्टिक पोस्टर काही वेळापूर्वीच रिलीज करण्यात आले आहे. त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची देखील घोषणा या पोस्टरमधून केली. थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात येणार होता. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे.

आपल्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बहूप्रतिक्षित ‘तूफान’ चित्रपटाचे दोन पोस्टर अभिनेता फरहान अख्तर याने रिलीज केले आहेत. दोन्ही पोस्टरमध्ये अभिनेता फरहानचे दोन वेगवेगळे लूक पहायला मिळत आहेत. पहिल्या रोमॅण्टिक पोस्टरमध्ये फरहानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर दिसून येत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये फरहान बॉक्सिंग करताना दिसून येत आहे. हे दोन्ही पोस्टर शेअर करताना फरहानने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्याने लिहिले आहे की, तुम्हाला आयुष्य तोपर्यंत खचू देत नाही, जोपर्यंत तुम्ही प्रेमाने बांधलेले असता. ३० जून रोजी ट्रेलर आऊट होत आहे.


त्यामुळे ‘तूफान’च्या चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. ‘तूफान’चा तूफानी ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 30 जून म्हणजेच उद्या रिलीज होणार असून येते दोन दिवस चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहाचे असणार आहेत.


रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘तूफान’चे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकुर व परेश रावल यांच्या देखील भूमिका आहेत. ‘तूफान’ भारतासह 240 देश व प्रदेशांमध्ये 16 जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.