अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला आपत्कालीन वापरासाठी DGCI ने दिली परवानगी!


नवी दिल्ली – भारतात आता कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आणखी एक लस येणार आहे. मुंबईतील औषधनिर्माण कंपनी सिपलाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून आपत्कालीन वापरासाठी मॉडर्नाच्या कोरोना लसी आयात करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यासंदर्भातील घोषणा लवकरच सरकारकडून होऊ शकते. अमेरिकेने यापूर्वीच ‘कोवॅक्स’ च्या माध्यमातून भारताला मॉडर्ना लसी देणार असल्याचे मान्य केले होते. तसेच, त्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून (सीडीएससीओ) मान्यता मागितली होती. यासंदर्भातील माहिती सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.

डीसीजीआयला या लसींच्या आयात व विपणन अधिकृततेसाठी अमेरिकेच्या फार्मा मेजरच्या वतीने सिप्लाने विनंती केली होती. त्यानंतर आता डीसीजीआयने सिपला कंपनीला ही लस आयात करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारतात लसीकरण मोहिमेअंतर्गत ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्यात येत आहे. आता मॉडर्ना लस भारतात आल्यानंतर नागरिकांना चौथा पर्याय उपलब्ध होणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मॉडर्नाची लस आरएनएवर अवलंबून आहे, जेणेकरून कोरोना व्हायरसविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी पेशी प्रोग्राम केल्या जाऊ शकतात. फायझर बरोबरच या लसीला लस श्रीमंत देशांनी पसंती दिली आहे. तज्ञांच्या मते, कोरोनाविरूद्ध ही लस ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

आतापर्यंत सुमारे १२० दशलक्ष अमेरिकन लोकांनी फायझर आणि मॉडर्नाचे डोस घेतले आहेत, त्यापैकी कोणालाही कोणतीही मोठी आरोग्य समस्या झाल्याचे समोर आलेले नाही. अमेरिका आणि युरोपियन युनियन एमआरएनए लस साठवण्यासाठी दबाव आणत आहे. जपानदेखील जूनच्या अखेरीस फायझरचे १०० दशलक्ष डोस साठवूण ठेवण्यासाठी काम करत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की अत्यल्प खर्च, शिपिंग आणि स्टोरेजच्या समस्यांमुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एमआरएनए-आधारित लसींची उपलब्धता मर्यादित असू शकते.नन