द कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सीजनसाठी एवढे मानधन घेणार कपिल शर्मा?


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला द कपिल शर्मा शोचा तिसरा सीझन येणार आहे. इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, जुलैमध्ये हा शो पुन्हा सुरु होऊ शकतो. तसेच या शोशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कपिल शर्माने शोच्या नवीन सीझनसाठी आपले मानधन वाढवले आहे. जसजशी कपिलची लोकप्रियता वाढत आहे, तसतसे त्याचे मानधनही वाढत आहे. पण जरी त्याने मानधन वाढवले असले तरी निर्माते त्याच्यावर पैसा खर्च करायला तयार असल्याचे दिसत आहे.

कपिल शर्मा हा गेल्या सीजनपर्यंत शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडसाठी 30 लाख रुपये घेत असल्याचे माध्यमांच्या रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे. त्याचबरोबर तो आता एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शनिवार आणि रविवारी कपिल शर्मा शो आठवड्यातून 2 दिवस प्रसारित केला जातो. त्यामुळे या अनुषंगाने कपिलची आठवड्याची फी 1 कोटी रुपये झाली आहे.

म्हणजेच महिन्याचा विचार केला तर कपिलची केवळ या शोची महिन्याची कमाई चार कोटींच्या घरात जाणार आहे. पण यामध्ये किती तथ्य आहे, हे आपण सांगू शकत नाही. पण माध्यमांमधील अशा बातम्यांमुळे सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या शोमध्ये झळकणाऱ्या सर्व कलाकारांपैकी कपिल शर्मा सर्वाधिक मानधन आकारत आहे. याशिवाय उर्वरित कलाकारही लाखो रुपये मानधन घेतात.

द कपिल शर्मा शो परत येणार असल्याची बातमी जेव्हापासून आली आहे तेव्हापासूनच प्रेक्षकांचा उत्साह आणखीन वाढला आहे. त्यांना अशा परिस्थितीत हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या तारखेपासून हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल. माध्यमांमधील वृत्तानुसार, द कपिल शर्मा शो जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा 22 जुलैपासून प्रसारित केला जाऊ शकतो. यासंदर्भात अद्याप अधिकृत कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही. परंतु पुढील महिन्यापासून हा कार्यक्रम प्रसारित होण्याची शक्यता आहे.