लॉक झालेले SD कार्ड अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या टिप्स


सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या बहुतांश स्मार्टफोनमधील इन बिल्ट स्टोरेजमध्ये कंपन्यांकडून वाढ करुन देण्यात आल्यामुळे सध्या पूर्वीसारखे मायक्रो एसडी कार्ड्स वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरीही आपल्यापैकी अनेकजण अद्याप मायक्रो एसडी कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. फोन व्यतिरिक्त, एसडी कार्ड डीएसएलआर कॅमेरा किंवा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये वापरले जाते.

पण बऱ्याच कारणांमुळे SD कार्ड लॉक होते. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की त्यामध्ये असलेल्या आवश्यक फोटो-व्हिडिओ किंवा कागदपत्रांचे काय होईल. आपले SD कार्ड लॉक झाल्यास घाबरू नका. हे सहजपणे अनलॉक केले जाऊ शकते. त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर जाणून घेऊया पूर्ण प्रक्रिया

  • आपल्याला मायक्रो एसडी कार्ड अनलॉक करण्यासाठी कम्प्यूटर वापरावा लागेल. यानंतर आपल्याला या स्टेप्सला फोलो करावे लागेल.
  • कम्प्यूटरसोबत एसडी कार्ड कनेक्ट करा. यासाठी कार्ड स्लॉट किंवा अ‍ॅडप्टर वापरा.
  • आता Windows आणि R keys एकाचवेळी दाबा, अॅडमिनिस्ट्रेटर रन कमांड येऊ द्या.
  • आता प्रत्येक कमांडवर आलेल्या एंट्री वर एंटर दाबा.
  • ‘Attributes Disk Clearonly’ ऑप्शन दिसल्यानंतर एंटर प्रेस करा.
  • आता आपल्याला ‘Disk Attributes Cleared Successfully’ दिसेल. याचा अर्थ आपली डिस्क अनलॉक झाली आहे.

लक्षात ठेवा की ही प्रोसेस करताना आपल्याला प्रत्येक कमांड काळजीपूर्वक पाहिल्यानंतर एंटर दाबावे लागेल, जेणेकरून आपल्या डेटा सुरक्षित राहील.