अशी असते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची दिनचर्या

trio
आपल्या पैकी बहुतके जणांना जगभरातील श्रीमंत व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांचे राहणीमान, ते दिवसाची सुरुवात कशी करतात, ते काय खातात-पितात त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्य याचा समावेश असतो. तर मग आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या दिनचर्येबद्दल सांगणार आहोत.
trio1
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची सकाळ व्यायामानेच सुरू होते. ते ट्रेड मिलवर एक तास काढताना काही शैक्षणिक डीव्हीडीजही पाहतात. ते म्हणतात नाश्त्याला ते Coca Puffs cereal घेतात. पण त्यांची पत्नी मेलिंडा सांगते, ते ब्रेकफास्ट घेत नाहीत.
trio2
पहाटे 5 वाजता ट्विटरचा संस्थापक जॅक डोर्सीची सकाळ सुरू होते. तो उठल्या उठल्या 30 मिनिट्स मेडिटेशन करतो. त्यानंतर 7 मिनिटांचे असे तीनदा वर्कआऊट्स करतात. मग कॉफी घेऊन तो ईमेल्सना उत्तर द्यायला बसतो.
trio3
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आपल्या झोपेलाही तितकेच महत्त्व देतात. ते म्हणतात, ते अलार्मशिवाय उठतात. त्यानंतर 10 वाजता तज्ज्ञांसोबत मीटिंग असते.
trio4
द ब्रेकशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफेट यांना झोप घ्यायला आवडते. ते 8 तास झोपतात. सकाळी 6.45ला उठतात. उठल्यावर द वाॅल स्ट्रीट जर्नल आणि युएसए टुडे ही वर्तमानपत्र वाचतात.
trio5
सकाळी 7 वाजता प्रसिद्ध अँकर ऑप्रा विर्न्फी उठते. ती उठल्या उठल्या तिच्या 5 कुत्र्यांना फिरायला घेऊन जाते. ती कॉफीसोबत रोज बाऊल भरून साकी हा तिचा नाश्ता घेते. त्यानंतर मेडिटेशन करते आणि मग टेकडीवर एक तास व्यायाम करते.
trio6
टेक्नॉलॉजीतला उद्योजक म्हणून एलान मस्क हा ओळखला जातो. त्याची सकाळही 7 वाजल्यापासून सुरू होते. पण तो उठल्या उठल्या कामाला लागतो. SpaceXचा उद्योजक अर्धा तास वाचन आणि टीकात्मक इमेल्सना उत्तरे यात घालवतो. ते करताना तो कॉफी पितो. नाश्त्याला त्याच्याकडे वेळ नसतो. आपल्या पाच मुलांना शाळेत पाठवले की तो आंघोळ करतो. मग ऑफिसला कारने निघतो. आठवड्याचे 120 तास काम करणाऱ्यांना हे रुटिन ओळखीचे वाटत असेल.

Leave a Comment