जगभरातील ही आहे सर्वात ट्रॅफिकजॅम होणारी शहरे


वाढती लोकसंख्या ही आपल्या भारतासह इतर अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यादेखील समस्या ठरत आहेत. त्यातच कोणी तुम्हाला ट्रॅफिकजॅम होणाऱ्या जगभरातील शहरांबद्दल विचारले तर तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता ? नाही… ना! चल तर मग आज आम्ही तुम्हाला जगभरातील सर्वात जास्त ट्रॅफिकजॅम शहरांबद्दलची माहिती देणार आहोत. नुकतीच टॉप 5 मोस्ट कंजस्टेड सिटींची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यात आपल्या देशातील 2 शहरांचा देखील समावेश आहे.

या यादीत रशियाची राजधानी मॉस्को हे पाचव्या स्थानावर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 56 टक्के जास्त वेळ या शहराच्या ट्रॅफिकमुळे लागतो.

या यादीत राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. नेहमी दिल्लीचे ट्रॅफिक बातमीचा विषय असतो. येथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गरजेपेक्षा 58 टक्के वेळ जास्त लागतो.

लिमा हे शहर ट्रॅफिक जॅम होणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरूची राजधानी लिमा येथेसुद्धा ट्रॅफिर जॅमचा प्रश्न आहे. येथेही दिल्लीसारखेच अपेक्षेपेक्षा 58 टक्के वेळ जास्त लागतो.

मोस्ट कंजस्टेड सिटीजच्या यादीत कोलंबियातील बोगोटा दुसऱ्या नंबरवर आहे. या देशात सार्वजनिक वाहतूक सुधारावी यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. तेथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अपेक्षेपेक्षा 63 टक्के वेळ जास्त लागतो.

आपली मुंबई मोस्ट कंजस्टेड सिटीजमध्ये जगात नंबर वन आहे. येथे एवढे ट्रॅफिक जॅम असते की, एखाद्या ठिकाणी पोहोचायला अपेक्षेपेक्षा 65 टक्के जास्त वेळ लागतो. केवळ ट्रॅफिक जॅममुळे हा एवढा वेळ आणि इंधन वाया जातं. गेल्या वर्षी टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या पाहणीत शहरांची ही यादी केली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला अंतराच्या हिशोबाने किती वेळ लागतो, यावरून हे रँकिंग ठरवले आहे.

Leave a Comment