कॅनडातील वैज्ञानिकांनी लावला मांसभक्षी वनस्पतीचा शोध


कॅनडातील वैज्ञानिकांनी अशा वनस्पतींचा शोध लावला असून ज्या मांसाहारी आहेत. पालीप्रमाणे दिसणारे जीव सॅलामँडरला या वनस्पती खातात. या वनस्पतींचा शोध कॅनडातील उभयचर प्राण्यांचे शोध केंद्र असणाऱ्या ‘अॅल्गोनकुइन प्रोव्हिंशिअल पार्कमध्ये’ लागला. तसेच, याभागात वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी आढळतात.

यासंदर्भात इकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित शोधनुसार, या ठिकाणी मागील दोन वर्षांपासून संशोधन सुरू होते. ‘युनिव्हर्सिटी ऑफ गुअल्फच्या’ शोधकर्त्यांनी 2017 मध्ये कॅनडामध्ये 144 पिचर प्लँट आढळले, यामध्ये 8 सॅलासँडरचे सहा पिले जिवंत आणि 2 मृत होते. याची माहिती नुकतीच त्यांनी समोर आणली आहे. इकोलॉजी जर्नलनुसार, अशा प्रकारच्या वनस्पतींची फक्त कल्पनाच केली जाऊ शकत होती. पण या वनस्पती संशोधकांच्या कठिण परिश्रमामुळे जगासमोर येण्यास मदत झाली. यादरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये संशोधकांच्या टिमने अशा प्रकारच्या 58 इतर वनस्पतींचा शोध घेतला होता. यामध्ये 20 टक्के वनस्पतीमध्ये सॅलासँडर आढळले होते. पण यातील काही जीव या वनस्पतीमध्ये 19 दिवस जिवंत राहिले. तर इतर जीव काही दिवसांतच मरण पावले.

याबाबत वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, ‘पिटफॉल ट्रॅप’ असे या वनस्पतीला म्हटले जाते. ओलावा आणि कमी पोषक घटक असलेल्या जमीनीत या वनस्पती वाढतात. तसेच, या वनस्पतीचे किटक आणि कोळी हे खाद्य आहे. किटकांची शिकार यामध्ये असलेल्या विशिष्ट द्रवपदार्थाद्वारे (अमृत) केली जाते. किटक वनस्पतीमध्ये असलेला सुगंध आणि रंगामुळे आकर्षित होतात आणि वनस्पतींजवळ आल्यावर कैद होतात.

नायट्रोजनचे प्रमाण जमिनीत कमी झाल्यामुळे मांस या वनस्पती खात असल्यामुळे त्यांना किटक आणि जीव नायट्रोजनची पूर्तता करण्यासाठी खावे लागतात. तसेच, फिलीपिन्समधील संशोधकांनी उंदिर खाणाऱ्या वनस्पतीचा शोध घेतला होता. संशोधकांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या वनस्पती पोषक तत्वांच्या गरजेनुसार शिकार करतात.

Leave a Comment