उचकी येणे ही एक नैसर्गिक क्रिया असून ती एक सामान्य बाब आहे. उचकी जेवताना किंवा जास्त तिखट लागल्याने येते. उचकी सामान्यतः पाणी पिण्याने, प्राणायम केल्याने किंवा तूपभात खाण्याने बंद होते. परंतू उचकी बऱ्याचवेळा हे उपाय करुनही काही थांबत नाही. अशा प्रकारची न थांबणारी उचकी हा एक वातप्रकोप असतो.
वारंवार लागणारी उचकी थांबत नसेल तर ‘हे’ उपाय करा
अशा वेळेस पिंपळाची साल बारीक कुटून तिची वस्त्रगाळ पूड बनवा. एक चमचा मधाबरोबर ही पूड सेवन करावी. न थांबणारी उचकी या उपायामुळे लगेच बंद होते. जोपर्यंत उचकी थांबत नाही, तोपर्यंत जेवन करुन नये.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही