४ मुलांना सांभाळून वयाच्या चाळीशीनंतरही ‘ती’ करते बॉडी बिल्डींग

amanda
मेलबर्न – महिला जवळपास ४०व्या वर्षानंतर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. पण स्वतःला फिट ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहणाऱ्या अमांडा जोहार्टी रोज सकाळी तीन वाजता जिममध्ये जातात. त्याचबरोबर दिवसातून ७ वेळा त्या जेवण करतात. बॉडी बिल्डिंगचा ४३ वर्षीय अमांडा यांना छंद आहे आणि त्यांना चार मुलेही आहेत.
amanda1
अमांडा सांगतात की, त्या पहाटे ३ वाजता रेल्वेने जिममध्ये दिवसभर मुलांच्या कामांवर परिणाम होऊ नये म्हणून जातात. त्या मुले उठण्यापूर्वी घरीदेखिल परततात. बॉडी बिल्डींगचा मला छंद असल्यामुळे मी फिट राहण्यासाठी दिवसातून सात वेळा जेवण करते असेही त्या सांगतात. त्या पुढील आठवड्यात मेलबर्नमध्ये होणाऱ्या अरनॉल्ड क्लासिक ऑस्ट्रेलियन कॉम्पिटीशनमध्येही सहभागी होणार आहेत.
amanda2
अमांडा स्पोर्टसच्या बाबतीत खूपच मेहनती आहेत. पण त्यांना मुलांकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे सकाळी तीन वाजता जिमला जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी उठून कॉफी घेऊन थेट जिमला जायचे आणि त्याठिकाणी तीन तास व्यायाम करायचा अशा प्रकारे तिचा दिवस सुरू होता. जेव्हा अमांडा १९ वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांनी बॉडी बिल्डिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यांचा २७व्या वर्षी विवाह झाला होता. पहिले बाळंतपणानंतर त्यांचे वजन १५ ते २०किलोने वाढले होते. पण त्यांनी पुन्हा व्यायामाने वजन कमी केले आणि फिट बनल्या.

Leave a Comment