बेडशीट विकत घेताना जरा ‘या’ गोष्टींकडे देखील लक्षात असू द्या


कामावरुन सुटल्यावर कधी एकदा घरी जातो आणि कधी एकदाच पडतो अशी आपल्यापैकी बहुतेकजणांची इच्छा असते. थोडावेळ बिछान्यावर पडल्यानंतर आपला थकवा थोडा का होईना पण आरामदायक वाटते. पण ज्या बिछान्यावर तुम्ही पडणार आहात ती जर अस्वच्छ आणि व्यवस्थित नसेल, तर आपला चेहरा पाहण्यालायक होतो. पण बिछान्यावर पडल्यावर तुम्हाला आनंद भेटला पाहिजेतर बेडशीट विकत घेण्याआधी तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे.

तुम्ही बेडशीट दिसायला चांगली वाटली म्हणून विकत घेऊ नका. बेडशीट विकत घेताना रंगसंगती आणि तुमच्या घरातील फर्निचर आणि रंगासोबत ती कशी दिसेल याचाही विचार करा. कॉटनच्या बेडशीट्स उन्हाळ्यात वापरणे उत्तम पर्याय आहे. यासोबतच जास्त भरगच्च डिझाईन नसलेल्या इंग्लिश कलर किंवा डोळ्यांना शांत वाटणारे रंग वापरले तर खुप चांगले होईल.

बेडशीटचा आकारदेखील महत्त्वाचा ठरतो. तुम्ही कॉटनची बेडशीट खरेदी करताना ही काळजी घ्यायालच हवी. कारण धुतल्यानंतर कॉटन हे आकसते किंवा प्रमाणापेक्षा मोठे किंवा लहान बेडशीट घेतल्यास ती सारखी चुरगळत रहाते किंवा बाहेर येते. त्यामुळे तुमचा बेड नीट दिसत नाही.

दररोज वापरण्याच्या बेडशीट्स खरेदी करताना त्या रिकल फ्री असतील आणि धुण्यासाठी सोप्या असतील याची काळजी घ्या. बेडरूमला बेडशीटच्या रंगामुळे वेगळा लुक येतो. त्यामुळे बेडशीट बेडरूमच्या भिंतीचा रंग लक्षात ठेऊन विकत घ्या. ती भिंतीच्या रंगाला परफेक्ट मॅच झाली तर एक वेगळीच शोभा येते. कुणासाठी बेडशीट विकत घेत आहात हे देखील महत्त्वाचे ठरते. बेडशीट जर लहान मुलांसाठी विकत घेत असाल तर त्यावर कार्टून्स आणि मोठ्यांसाठी खरेदी करत असाल तर त्यावर फ्लोरल प्रिंट असलेली बेडशीट खरेदी करावी.

Leave a Comment