किरकोळ आजारावर काळे जिरे ठरेल रामबाण


भारतीय स्वयंपाकघर म्हणजे अनेक प्रकारच्या पदार्थांचे जणू गोदाम म्हटले तरी ते चूक ठरू नये. भारतीय पदार्थात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात आणि त्यामुळे प्रत्येक घरात या मसाल्यासाठी लागणारे साहित्य असतेच. यातील अनेक पदार्थ औषधी गुणांनी परिपूर्ण असून किरकोळ आजारात अगदी घराच्या घरी उपचार करण्यासाठी सुरक्षित आणि उपयुक्त ठरतात.

या पदार्थातील एक म्हणजे काळे जिरे. याचा वापर प्रामुख्याने मसाला बनविताना केला जात असला तरी किरकोळ स्वरूपाच्या अनेक आजारांवर या जिऱ्याचे सेवन रामबाण उपाय ठरते. अनेक जीवनसत्वाने युक्त असलेले हे जिरे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आहे आणि लठ्ठ लोकांना वजन कमी करण्यास सहाय्यकारी आहे. काळे जिरे नियमित पणे तीन महिने खाल्ल्यास शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते आणि शरीरात उत्साह वाढतो, चुस्ती स्फूर्ती मिळते. हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते आणि चरबी विरघळवून शरीराबाहेर काढण्यास मदत करते.


ज्यांना युरीन इन्फेक्शन होते त्यांनी रोज रात्री काळे जिरे पाण्यात भिजवून ते पाणी अनोश्या पोटी प्यावे. त्यामुळे युरीन भरपूर प्रमाणात होते आणि ब्लोकेज मोकळी होतात. पोटाच्या अनेक तक्रारीवर काळे जिरे उपयोगी आहे. त्यातील अँटीमायक्रोबियल गुणामुळे गॅसेस कमी होतात, पोट फुगणे, पोट दुखी, जुलाब, पोटातील जंत किंवा कृमी नष्ट होतात. इनहेलर म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करता येतो. यासाठी हे जिरे भाजून रुमालात बांधावे आणि हा रुमाल वारंवार हुंगावा. त्यामुळे अस्थमा, खोकला, ब्रॉकायटीस, अॅलर्जी मुळे येणाऱ्या खोकल्यास आराम पडतो. श्वसन विकारात हा उपाय लाभदायी आहे.

तीव्र डोकेदुखी असेल तर काळ्या जिरयाने मालिश केल्यास आराम पडतो, मायग्रेन मधेही हा उपाय फायदेशीर ठरतो. दातदुखीसाठी किंवा तोंडाला वास येत असल्यास गरम पाण्यात काळे जिरे तेल थेंब टाकून त्याने गुळण्या कराव्यात. काळ्या जिरयाच्या पावडरचा लेप जखमा, फोड, पुटकुळ्यावर लावल्यास इन्फेक्शन पसरत नाही. शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी आहारात नित्य या जिऱ्याचा समावेश करावा. भूक लागत नसेल तर सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात जिरे पूड मिसळून प्यायल्याने पोट साफ होते व चांगली भूक लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment