करोना काळात  वेगळ्याच लफड्यात अडकले ब्रिटन आरोग्यमंत्री

ब्रिटन मध्ये करोनाची तिसरी लाट उग्र रूप धारण करू लागली असताना ‘द सन’ या वृत्तपत्राने आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक, त्यांची जवळची सहकारी जीना कोलाडांगेलो हिच्या बरोबर इश्क फार्मावत असल्याचे फोटो कॅमेऱ्यात टिपले असल्याने आरोग्यमंत्री अडचणीत आले आहेत. ४२ वर्षीय मॅट लंडनच्या स्वास्थ्य विभाग मुख्यालयात कार्यालयाबाहेर जीना ला किस करत असल्याचे फोटो सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. अर्थात हे फोटो गेल्या महिन्याच्या सहा तारखेचे आहेत.

जीना आणि मॅट नेहमीच बरोबर दिसतात आणि त्यामुळे त्याविषयी चर्चा अगोदरच सुरु होती. मॅट विवाहित असून त्यांना तीन मुले आहेत. तसेच जीना सुद्धा विवाहित आहे आणि तिला तीन मुले आहेत. देशात करोनाचा उद्रेक असताना आरोग्य मंत्री रोमांस मध्ये गुंग असल्याने टीकेचे धनी झाले आहेत. द सनच्या बातमीनुसार मॅट यांनी जीनाची करदात्यांच्या पैशातून, स्वतःची सल्लागार म्हणून गतवर्षी गुप्तपणे नेमणूक केली होती. मॅट यांचा विवाह १५ वर्षापूर्वी झाला आहे तर जीनाचे पती ओलीवर बोनास याचे फॅशन आणि लाईफस्टाईल स्टोर आहे. जीना लॉबिंग फर्म ल्युथर पेन्ट्रागॉन मध्ये निदेशक म्हणूनही कार्यरत आहे.

करोना हाताळणीत सरकारला अपयश आल्याचा आरोप पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर होत असून बोरीस यांचे माजी सहकारी डोमिनिक क्युमिंग यांनी मॅट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डोमिनिक यांच्या म्हणण्यानुसार खोटे बोलण्यासह किमान १५ ते २० बाबी मॅट यांच्या विरोधात आहेत त्यामुळे त्यांना काढून टाकले पाहिजे.