जया बच्चन डिजिटल डेब्यूसाठी तयार

बॉलीवूड जगतात बच्चन कुटुंब नेहमीच चर्चत असते. मग त्या बातम्या वैयक्तिक, खासगी असोत की व्यावसायिक. बच्चन चाहते नेहमीच या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यांच्यासाठी ही नवी बातमी. अभिनेत्री आणि दीर्घकाळ राजकरणात सक्रीय असलेल्या जया बच्चन यांनी डिजिटल डेब्यूची तयारी केली आहे. ‘सदाबहार’ या वेबसिरीज मधून त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहेत.

बिगबी अमिताभ बच्चन यांनी गुलाबो सिताबो मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे तर अभिषेक बच्चन यांनी चित्रपट आणि वेबसिरीज मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाउल टाकले आहे. स्पॉट बॉयच्या माहितीनुसार जया बच्चन यांच्या वेबसिरीजचे शुटींग फेब्रुवारी मध्येच सुरु झाले होते मात्र करोना लॉकडाऊन मुळे ते बंद झाले होते. आत्ता हे शुटींग परत सुरु झाले आहे.

बायोबबल मध्ये ५० जणांचे युनिट करोनाचे सर्व नियम पाळून शुटींग करत आहे. दोन सिक्वेन्सचे शुटींग या पद्धतीने पूर्ण झाले आहे. या सिरीजचा विषय कळलेला नाही. मात्र जया यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करीना आणि अर्जुन कपूरच्या ‘का अँड की’ मध्ये जया बच्चन यापूर्वी दिसल्या होत्या. पाच वर्षाच्या गॅप नंतर त्या पुन्हा अभिनय करणार आहेत.