एक जबरदस्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून इंस्टाग्राम हे ओळखले जाते. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला फोटो, व्हिडीओ शेअर करता येतात. अनेक प्रकारची माहितीची देवाणघेवाण याच्या माध्यमातून करता येते. पण इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे इंस्टाग्रामवरील कंटेन्ट क्षणभंगुर आणि वेगवान वाहतो. त्यामुळे फोटो आणि पोस्ट्स डाउनलोड किंवा सेव कसे करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
असे Save करता येतील इंस्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ
स्वतःचा इन्स्टाग्राम फोटो आपल्याला सेव्ह करायचा असेल किंवा तो इतरत्र शेअर करू इच्छित असाल किंवा आपल्याला इतरांनी शेअर केलेला कंटेन्ट डाउनलोड करू इच्छित असाल तर इन्स्टाग्राम फोटो कसे सेव्ह करावे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.
- आपण इन्स्टाग्राम अॅपमध्ये कॅप्चर केलेले, फिल्टर केलेले आणि एडीट केलेले फोटो आपल्या फोनच्या फोटो लायब्ररीमध्ये सेव्ह करणे इन्स्टाग्रामने खूप सोपे केले आहे.
- सर्वप्रथम इन्स्टाग्राम अॅप उघडा आणि आपल्या स्क्रीनच्या शेवटी माणसाच्या आकाराचे (person-shaped) चिन्ह टॅप करून आपल्या प्रोफाइलकडे जा.
- मेनू पॉप-अप उघडल्यानंतर पहिला Settings पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. त्यानंतर Account ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर Original Photos पर्याय येईल. हा ऑप्शन iOS डिव्हाईस वापरणाऱ्यांना दिसेल, जे Android युजर्स आहेत त्यांना Original Posts असा पर्याय दिसेल.
- आता आपल्याला इंस्टाग्राम अॅप फोटो automatically सेव्ह करण्याचा पर्याय देते. फक्त तुम्हाला Save Original Photos/Posts या पर्यायाला सक्रीय करायचे आहे. हा पर्याय सुरु झाल्यानंतर आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करता तो प्रत्येक फोटो आपल्या फोनच्या फोटो लायब्ररीत सेव्ह होईल.
- इन्स्टाग्राम अॅपच्या प्रायवेट एरियातील कोणताही फोटो किंवा व्हिडिओ आपल्या सेव्ह करणे सोपे आहे. जो आपल्याला नंतर कधीही पाहता येईल. पण, ज्यांना आपण फॉलो करत नाही किंवा आपल्याला फॉलो न करणाऱ्या युजर्सचे फोटो, व्हिडीओ सेव कसे करायचे? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी सोपा पर्याय आहे.
- कोणतीही पोस्ट सेव करण्यासाठी, बुकमार्क चिन्हावर टॅप करा. त्यानंतर पोस्ट आपल्या Saved फोल्डरमध्ये पोस्ट जतन होईल. जर तुम्हाला तुमच्या अॅपच्या प्रायव्हेट एरियातील कोणतीही पोस्ट सेव्ह करायची असेल तर बुकमार्क चिन्हावर टॅप करा आणि धरून ठेवा. हे आपण आधीपासून तयार केलेल्या इन्स्टाग्राम संग्रहांचे पॉप अप उघडेल. तसेच आपल्याला नवीन संग्रह तयार करण्याचा पर्याय देखील देते. येथे plus चिन्हावर टॅप करा आपोआप संग्रह तयार होईल.
- आता आपण सेव्ह केलेले फोटो किंवा व्हिडिओ आपण तयार केलेले संग्रह पाहण्यासाठी, माणसाच्या आकाराच्या चिन्हावर टॅप करून आपल्या प्रोफाइलवर जा, त्यानंतर पॉप-अप मेनूमध्ये दिसणारा Saved पर्याय टॅप करा. हे आपल्याला आपली सर्व सेव केलेला कंटेन्ट पाहायला मिळेल.