‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेले काही लोक पडत आहेत ‘गुलिअन बेरी सिंड्रोम’ला बळी!


मुंबई : कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण मोहिमेने देशभरात वेग घेतला आहे. देशात रेकॉर्ड स्तरावर लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. पण प्रत्येकाला हे माहित आहे की, लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतल्यानंतर काही लोक ‘गुलिअन बेरी सिंड्रोम’चा अनुभव घेत आहेत. या अभ्यासानुसार, ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस (कोव्हिशिल्ड) घेतल्यानंतर काही लोकांमध्ये ‘गुलिअन बेरी सिंड्रोम’ नावाचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दिसून येत आहे.

या संदर्भात भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, भारतात अशी एकूण 11 प्रकरणे आढळली आहेत, ज्यात कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर ‘गुलिअन बेरी सिंड्रोम’ झाला आहे. आतापर्यंत देशातील 1.2 दशलक्ष लोकांना ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका अर्थात कोव्हिशिल्ड लस दिली गेली आहे. तथापि, आता गुलिअन बेरी सिंड्रोमवर संशोधन चालू आहे.

एका अभ्यासाने केलेल्या दाव्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर भारतातील लोकांना गुलिअन बेरी सिंड्रोम नावाचा रोग होत आहे. मज्जा आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर हा रोग परिणाम करतो. गुलिअन बेरी सिंड्रोम ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारक शक्ती निरोगी ऊतींवर परिणाम करते.

गुलिअन बेरी सिंड्रोम ग्रस्त एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेच्या निरोगी ऊतकांवर हल्ला करते आणि नष्ट करते. हे सिंड्रोम सामान्यत: बॅक्टेरियाच्या किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होते. या सिंड्रोममुळे शरीरात अर्धांगवायूचा त्रास देखील होऊ शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, शरीरात गुलिअन बेरी सिंड्रोममुळे अत्यंत कमकुवतपणा दिसून आला आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये केलेल्या अभ्यासानुसार या सिंड्रोमची आतापर्यंत एकूण 11 प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यामध्ये केरळ राज्यातील 7 आहेत. या सिंड्रोमग्रस्त व्यक्तींनी ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीचा एक डोस घेतला होता, ज्या लसीला भारतात ‘कोव्हिशिल्ड’ म्हणून ओळखले जाते. या सिंड्रोमसंदर्भातील अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका आठवड्यात हा आजार झाला आहे.

जगभरात गुलिअन बेरी सिंड्रोम संदर्भात बरेच संशोधन आणि अभ्यास चालू आहे. या रोगाचे नेमके कारण शास्त्रज्ञांना अद्याप कळलेले नाही. तथापि, या रोगात, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नसांवर आक्रमण करते, ज्यामुळे समस्या उद्भवतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकच्या म्हणण्यानुसार, गुलिअन बेरी सिंड्रोमच्या काही प्रकरणांमध्ये, शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती व्हायरस, बॅक्टेरिया आणि मज्जातंतूमध्ये उपस्थित असलेल्या विशिष्ट रसायनांच्या संसर्गाशी लढण्यासाठी मज्जासंस्थेवर हल्ला करते. कारण ते पेशींमध्ये असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यावर हल्ला करते. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत 2009मध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झालेल्या लसीकरणात हा आजार सर्वप्रथम दिसून आला होता.

कोरोना लस घेतल्यानंतर गुलिअन बेरी सिंड्रोमच्या समस्येसंदर्भात अ‍ॅनाल्स ऑफ न्यूरोलॉजीद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गुलिअन बेरी सिंड्रोममुळे पीडित व्यक्तीच्या शरीरात अत्यंत अशक्तपणाची समस्या उद्भवली आहे.

गुलिअन बेरी सिंड्रोमची कोणती लक्षणे ?

या सिंड्रोममुळे, अशक्तपणासह, शरीरात वेदना आणि चेहरा लटकणे या समस्यांचा देखील समावेश आहे. कोरोना लस घेतल्यानंतर हा सिंड्रोम असल्याचे ज्या लोकांना दिसून आले, त्यांना पायामध्ये मुंग्या येणे, शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना आणि बोलण्यात समस्या यासारख्या समस्या उद्भवतात. गुलिअन बेरी सिंड्रोमची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

  • शरीरात अत्यंत अशक्तपणा
  • बोटांमध्ये, गुडघ्यांमध्ये किंवा मनगटात टोचल्यासारखे होणे
  • चेहऱ्यावरील स्नायू लटकणे
  • अशक्तपणा आणि पाय दुखणे
  • चालण्यात अडचण
  • बोलणे आणि खाण्यात अडचण
  • डोळे दुखणे
  • शरीरात पेटके येणे
  • रक्तदाब पातळी असंतुलन
  • धाप लागणे

अद्याप गुलिअन बेरी सिंड्रोमच्या समस्येवर अचूक उपचार सापडलेले नाहीत. तथापि, या समस्येमुळे उद्भवणारी समस्या कमी करण्यासाठी डॉक्टर काही उपाय करतात. गुलिअन बेरी सिंड्रोममुळे होणारे मज्जासंस्थेचे नुकसान दुरूस्त करण्यासाठी फिजिशियन प्लाझ्मा एक्सचेंज आणि इम्युनोग्लोबुलिन थेरपीचा आधार घेतात. या व्यतिरिक्त, हा रोग रोखण्यासाठी, योग्य आणि संतुलित आहार घेणे आणि लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

गुलिअन बेरी सिंड्रोम हा व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल रोग आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. भारत आणि इंग्लंडमध्ये केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाला प्रतिबंध निर्माण करणाऱ्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका (कोव्हिशिल्ड) लसीचा डोस घेतल्यानंतर 11 लोकांमध्ये या समस्येची पुष्टी झाली आहे, त्यापैकी 7 प्रकरणे भारतातील आहेत. या संदर्भात सविस्तर अभ्यास अद्यापही सुरू आहे.