४ ऑलिम्पिक मध्ये देश प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू सानिया मिर्झा

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा २३ जुलै पासून सुरु होत असलेल्या टोक्यो ऑलिम्पिक २०२० साठी तयार झाली आहे. टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाल्यावर सानिया चार ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू ठरणार आहे. ३४ वर्षीय सानिया ऑलिम्पिक साठी जोरदार सराव करत आहे.

एका मुलाखतीत बोलताना सानिया म्हणाली, ‘ माझे खेळातील करियर चांगले आहे. स्वतःवर आणि माझ्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कधीपर्यंत खेळणार याचा विचार केलेला नाही. रोजचा दिवस माझ्यासाठी नवी उमेद घेऊन येतो. खेळातून निवृत्ती सध्या तरी नाहीच.’

सानियाने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिल्यावर गेल्या जानेवारीत होबार्ट इंटरनॅशनल डब्ल्यूटीए मध्ये विजय मिळवून मैदानवर पुनरागमन केले आहे. सानिया संरक्षित विश्व रँकिंग ९ सह ऑलिम्पिक मध्ये सहभागी होत असून पहिल्या १०० खेळाडूत असलेली, भारताच्या सर्वोच्च रँकिंगची, अंकिता रैना तिची जोडीदार आहे.