सॅमसंगची सिक्स जी तंत्रज्ञानात आघाडी
जगातील अनेक देश अद्यापी फोर जी मध्ये अडकले असून काही देशात फाईव्ह जी तंत्रज्ञान येऊ घातले आहे. काही प्रगत देशांनी सिक्स जी ची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र द. कोरीयाच्या सॅमसंग कंपनीने सिक्स जी तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. सिक्स जी तंत्रज्ञानाचा विकास अतिशय वेगाने होत असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष, उत्पादन धोरण प्रमुख वोनील रोह यांनी म्हटले आहे.
फाईव्ह जी वर एक प्रेझेंटेशन देताना ते बोलत होते. रोह म्हणाले ५ जी नेटवर्कवर कंपनीने ५.२३ गिगाबाईट प्रती सेकंड वेग मिळविला आहे. सिक्स जी मुळे विविध तंत्रज्ञानासह एक असे जग बनेल जेथे या तंत्रज्ञानाला वास्तविकता देण्याचा उत्साह असेल. या पूर्वीच टेरा हर्ट्झ संचार प्रदर्शन सॅमसंगने केले आहे. फाईव्ह जी च्या तुलनेत सिक्स जी चा वेग ५० पट अधिक असेल आणि २०२८ पर्यंत त्याचा व्यावसायिक पातळीवर वापर सुरु होईल.
यासाठी एआय, रोबोटिक्स, व्हिज्युअल टेक्नोलॉजी, सिक्युरिटी संदर्भात सतत नवीन संशोधन सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.