करोना काळातही चीन मध्ये साजरा होतोय डॉग मीट फेस्टिव्हल

जगातील बहुसंख्य देशातील नागरिकांना वेठीला धरणाऱ्या करोनाला जन्म दिल्याबद्दल चीन विरोधी वातावरण तापले असतानाच या संतापात आणखी भर घालणारी कृती चीन कडून केली गेली आहे. चीन मध्ये या वर्षी वादग्रस्त ठरलेल्या डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन केले गेले असून दहा दिवस हा फेस्टिव्हल सुरु राहणार आहे.

युलीन येथे हा महोत्सव सुरु झाला असून दरवर्षी या महोत्सवात लाखो नागरिक सहभागी होतात. अनेक प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था या महोत्सवाविरुद्द दरवर्षी विरोध प्रदर्शित करतात तरीही चीन मध्ये हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या महोत्सवात हजारो कुत्री उकडून, जिवंत भाजून आवडीने खाल्ली जातात. त्यासाठी महोत्सवाच्या काही महिने अगोदर पासून कुत्र्यांची तस्करी, चोऱ्या सुरु होतात.

चीनी चिकन, मटन प्रमाणे कुत्री, मांजरे, साप, झुरळे मोठ्या आवडीने खातात. वटवाघुळे खाण्याची सुरवात चिन्यांनीच केल्याचे सांगितले जाते. करोना उद्रेकामुळे या वर्षी हा महोत्सव होणार नाही असी आशा व्यक्त केली जात होती.