अंतराळ जगात भारत नक्की कुठे

गेली काही वर्षे अंतराळ जगात भारताने आपले स्वामित्व सिध्द केले आहे. अमेरिका रशिया बरोबर स्पर्धा करताना भारताने अंतराळ क्षेत्रात असे स्थान मिळविले आहे जेथे जगातील फारच थोडे देश पोहोचले आहेत. भारताच्या मिशन चांद्रयान ला अपेक्षित यश मिळाले नसले तरी जागतिक पडद्यावर भारताचा डंका वाजला आहेच. युनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्ट सॅटेलाईट डेटा बेस यादी वरून जगाच्या कुठल्या देशाचे अंतराळ जगात नाव आहे हे समजते.

यानुसार अमेरिकेचे अंतराळात १०३८ उपग्रह आहेत तर चीनी उपग्रहांची संख्या आहे ३५६. रशियाचे १६७, जपानचे ७८, भारताचे ५८ उपग्रह अंतराळात आहेत. या एकूण उपग्रहापैकी ३३९ उपग्रह लष्करी उपयोगाचे आहे, १३३ सिविल उपयोगाचे, १४४० कमर्शियल तर ३१८ उपग्रहांचा वापर संयुक्त कारणासाठी केला जात आहे.

भारताच्या अंतराळ प्रवासाची सुरवात २१ नोव्हेंबर ६३ साली केरळच्या थुंबा येथून अमेरिका निर्मित दोन फेजवाला नाईक अपाचे प्रक्षेपण करून झाली. त्यावेळी आपल्याकडे त्यासाठी आवश्यक अशा कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्याच पण थुंबा येथे रॉकेट प्रक्षेपण स्टेशन इमारत सुद्धा नव्हती. स्थानिक बिशपच्या घरात ऑफिस बनविले गेले होते आणि सेंट मेग्दलीन चर्च इमारतीचा वापर कंट्रोल रूम म्हणून केला गेला होता. रॉकेटचे सुटे भाग बैलगाडी आणि सायकल वरून आणले गेले होते.

१६ नोव्हेंबर २०१३ मध्ये भारताने अंतराळ विज्ञान इतिहासात नवीन अध्याय लिहिला. श्रीहरीकोटा येथून पीव्हीसीएल -२५ मार्स ऑर्बीटर मंगळयान प्रवास सुरु केला आणि २४ सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळ कक्षेत पोहोचण्यासाठी राबविल्या गेलेल्या अभियानाला प्रथमच यश मिळविणारा भारत पहिला देश ठरला. भारताचे हे मंगळ अभियान जगातील सर्वात स्वस्त अभियान ठरले आहे.