अक्षयने बहिण अलकाला डेडीकेट केला ‘रक्षाबंधन’

करोना ओसरू लागल्याने आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असून अनेक चित्रपटाची खोळंबलेली शुटींग परत सुरु झाली आहेत. बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार रक्षाबंधन या चित्रपटाच्या सेटवर परत आला आहे. त्याने या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये अक्षयने हा चित्रपट त्याची खरी सख्खी बहिण अलका हिला डेडीकेट केल्याचे म्हटले आहे. अक्षय लिहितो,’ मी मोठा होत होतो तेव्हा माझी पहिली दोस्त अलकाच होती. ही मैत्री अगदी नैसर्गिक होती. रक्षाबंधन हा चित्रपट या विशेष बंधनाचा उत्सव आहे.’

अक्षयने शेअर केलेल्या फोटोत तो चित्रपट कथाकार हिमांशु शर्मा याच्यासोबत एका दुकानच्या पायरीवर बसलेला दिसतो आहे. या चित्रपटात अक्षय एका घड्याळ दुकानदाराच्या भूमिकेत दिसेल असे समजते. या चित्रपटात त्याची नायिका भूमी पेडणेकर आहे. यापूर्वी तिने अक्षय बरोबर टॉयलेट एक प्रेम कथा मध्ये भूमिका केली आहे. सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खातीब आणि स्मृती श्रीकांत यात अक्षयच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.