ईडीने जप्त केली उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता


पुणे – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यांच्यावर मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला होता. अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर ईडीने छापेही टाकले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले हे गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर होते. भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने भोसले यांची मालमत्ता फेमा कायद्याअंतर्गत जप्त केली आहे. भोसले यांची मनी लॉड्रींग प्रकरणात दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.