जो बायडेन यांनी पुतीनना दिली विशेष गॉगल्सची भेट

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन या दोन बड्या नेत्याची गेल्या आठवड्यात जिनेव्हा येथे ऐतिहासिक भेट झाली. त्यावेळी पुतीन यांना बायडेन यांनी एक विशेष चष्मा भेट म्हणून दिला आणि आता हा चष्मा चर्चेचा विषय बनला आहे. हा चष्मा गॉगल्स प्रकारातील असून तो अमेरिकन कंपनी रन्डोल्फ यांनी तयार केला आहे. या कंपनीचे सनग्लासेस अमेरिकन सेना आणि नाटो देशांना पुरविले जातात.

पुतीन यांना गिफ्ट केला गेलेला एचजीयु-जी/पी अॅव्हीएटर गॉगल खास फायटर पायलट साठी डिझाईन केले गेलेला आहे. पुतीन यांना दिला गेलेला हा गॉगल बनवायला ६ आठवडे लागले असून त्यासाठी दोनशे स्टेप्स वापराव्या लागल्या. त्यानंतर हा काँकार्ड स्टाईल गॉगल तयार झाला. २० व्या शतकातील प्रसिद्ध सुपरसॉनिक विमानावरून याचे नाव ठेवले गेले आहे.

रंडोल्फ इंजिनिअरिंगच्या अधिकृत वेबसाईटवर मॅट ब्लॅक पोलोराईज्ड जोडीची किंमत २० हजार रुपये आहे. कंपनीचे अध्यक्ष पिटर विज्कीविज्को म्हणतात, बायडेन यांनी पुतीन यांना अमेरिकन राष्ट्रीय वारश्याचे प्रतिक, जे सेनेसाठी वापरले जाते ते दिले आहे. १९७८ मध्ये अमेरिकन सेनेबरोबर या गॉगल पुरवठ्याचा करार झाला होता आणि महिन्याला असे २५ हजार गॉगल सेनेकडून खरेदी केले जातात. आता हे गॉगल राजकीय टोकन बनले याचा आनंद वाटतो.’ पुतीन बायडेन बैठक झाल्यापासून पिटर याना सतत फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले.