हवेतही अनुभवता येणार रेसिंग कारचा थरार

जमिनीवर सुसाट वेगाने धावणाऱ्या रेसिंग कारचा थरार अनेकांनी अनुभवला आहे. जग सध्या प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनाच्या मागे लागले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक व सेल्फ ड्रायविंग वाहने सध्या खूप चर्चेत आहेत. पण या वाहनांनंतर पुढे काय असा प्रश्न आहेच. तर त्याला ऑस्ट्रेलियन कंपनीने उत्तर दिले आहे. अलाऊडा एरोनॉटिक्स कंपनीने फ्लाईंग रेसिंग कार तयार केली आहे. ही कार जीमिनीवर वेगाने धावतेच पण हवेत सुद्धा ती त्याच वेगाने उडू शकते.

जगात ही पहिली फ्लाईंग रेसिंग कार असल्याचा दावा केला जात आहे. द. ऑस्ट्रेलिया मध्ये अलाऊडा एमके ३ फ्लाईंग कारच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. फेब्रुवारी मध्ये ही फ्लाईंग रेसिंग कार सादर केली गेली होती पण प्रथमच ती हवेत उडताना पाहिली गेली असे समजते. एमके ३,२०२१ जागतिक स्तरावर होणाऱ्या तीन विनाचालक फ्लाईंग कार एअरस्पिडर इएक्स ४ सिरीज पूर्वी सादर केले गेलेले मॉडेल आहे. पण जेव्हा फुल स्केल इलेक्ट्रिक फ्लाईंग रेसिंग सिरीज २०२१ नंतर सादर होईल तेव्हा मोटर स्पोर्ट मध्ये नवी पातळी गाठली जाईल असा कंपनीचा दावा आहे.

या कारला सिम्युलेटरच्या सहाय्याने दूरवरून कंट्रोल करता येथे. तिचे डिझाईन ५०-६० शाकातल्या रेसिंग कारवरून घेतले गेले आहे. ही कार व्हर्टीकल टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. ० ते १०० चा वेग ती २.८ सेकंदात घेते आणि हवेत १६४० फुट उंचीवरून उडू शकते. पूर्ण इलेक्ट्रिक अश्या या कारचे वजन १३० किलो असून ती ८० किलोचे वजन वाहून नेऊ शकते. सध्या ही कार रोबोटिक फॉर्म मध्ये असून रिमोट पायलट फॉर्म्युला वन स्टाईल रेस करू शकते. लवकरच यातून माणूस उडू शकणार आहे.

२०२१ मध्ये चार टीम मध्ये १० कार्स रेस मध्ये सहभागी होणार असून ही रेस ४५ मिनिटांची असेल. एमके ३ ची बॅटरी १५ मिनिटांनी बदलावी लागते त्यामुळे हा खेळ रोमांचक ठरेल असेही सांगितले जात आहे.