माव्या बनली जम्मू काश्मीर मधली पहिली फायटर पायलट

२३ वर्षीय माव्या सुदन ही भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनणारी जम्मू काश्मीरची पहिली महिला ठरली असून माव्या मुळची जम्मूच्या राजौरी येथील रहिवासी आहे. माव्या देशातील महिला फायटर बनणारी १२ वी महिला आहे. शनिवारी तेलंगाना येथील हुंदिगल वायुसेना अकादमीच्या पासिंग आउट परेड मध्ये सामील झालेच्या छात्रात ती एकमेव मुलगी होती. आता तिला एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे आणि त्यानंतर ती ऑपरेशनल पायलट बनेल.

माव्याचे वडील विनोद मुलीने मिळविलेल्या यशाने खुपच आनंदी आहेत. ते म्हणतात माव्या आता केवळ माझी मुलगी नाही तर देशाची कन्या बनली आहे. लहानपणापासून तिला भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनायची इच्छा होती आणि तिचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.

माव्या सांगते,’ ही तर सुरवात आहे. मला देशबांधवांकडून खूप प्रेम मिळते आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अजून खूप काही करायचे आहे. मला मिळालेल्या यशाने माझ्या गावकऱ्यांची छाती अभिमानाने भरून आली आहे.

अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोना सिंग या भारतीय हवाई दलात फायटर पायलट बनलेल्या पहिल्या तिघी महिला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एक फायटर पायलट तयार होण्यासाठी सरकारला १५ कोटी रुपये खर्च येतो.