दोन देशांचा राजा असूनही जनतेसाठी परदेशात बनला मेकॅनिक!

ghana
घाना आणि टोगो या 20 लाख लोकसंख्या असलेल्या दोन देशांचे राजे सीफस बन्साह (70) हे जगातील एकमेव असे राजे असतील जे कार मॅकेनिकही आहेत. स्काइपच्या माध्‍यमातून बन्साह आपल्या जनतेवर राज्य करतात. टोगोमध्‍ये त्यांना ‘सुपीरियर अँड स्पिरिच्युएल चीफ ऑफ इवे पीपल’ असे संबोधले जाते. त्यांचे पूर्ण नाव राजा टोगबे न्गोरयिफीआ सीफस बन्साह असे आहे.
ghana1
जर्मनीची ग्रॅबिएलशी 2000 मध्‍ये बन्साह यांचा विवाह झाला होता. कार्ली आणि कथरीना असे दोन आपत्य त्यांना आहेत. जर्मन छायाचित्रकार ख्रिस्त‍िना जायबिकने दुहेरी भूमिका करणा-या या राजाविषयी जगाला सांगण्‍यासाठी त्यांच्याबरोबर एक पूर्ण दिवस व्यतीत केला. त्याने आपल्या कॅमे-यात त्यांचे दैनंदिन दिनचर्या कैद केले. जायबिकला त्यांनी घानाला येण्‍याचे आमंत्रणही दिले आहे. जायबिकला वास्तविक ते कशाप्रकारचे राजे आहेत आणि त्यांचा प्रजेवर किती भरोसा आहे हे पाहायचे होते. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ख्रिस्तिना घानाला जात आहे.
ghana2
घानात जन्म झालेल्या सीफस राजा होण्‍यापूर्वी 1970 मध्‍ये जर्मनीला आले होते. पूर्व घानातील जबी हे शहर त्यांची राजधानी आहे. त्यांचे आजोबा येथील राजे होते. त्यांना मॅकेनिकचे प्रशिक्षण घेण्‍यासाठी आजोबांनीच जर्मनीला पाठवले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि जर्मनीचे नागरिकत्व घेतले. त्यांनी जर्मनीच्या ल्यूडिगशेफेनमध्‍ये स्वत:चे गॅरेज सुरु केले.
ghana3
ते 1987 पर्यंत शांततापूर्ण जीवन जगत होते. त्यांना या दरम्यान एक फॅक्स आला आणि त्यांचे आयुष्‍यच बदलून गेले. त्यांचे आजोबा आणि होहोईच्या राजाचे निधन झाले. राजापदासाठी त्यांचे वडील आणि मोठा भाऊ अपात्र ठरले. कारण ते डावखूरे होते. यास इबेचे लोक शुभ मानत नव्हते. सीफास यांना यानंतर त्यांच्या आजोबांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले. स्काइपच्या माध्‍यमातून ते आपला राज कारभार चालवतात आणि वर्षातून आठ वेळा घानाला जातात. ते आपल्या देशात शाळा चालवतात. आपल्या देशात त्यांनी महिला तुरुंगासाठी पैसे जमवले. ते यासाठी स्वत:चे बिअर अकोसोंबो देखील विकतात. विशेष म्हणजे, ते दारु पित नाहीत.

Leave a Comment