अत्तरांची नगरी म्हणून ओळखले जाते उत्तर प्रदेशमधील ‘हे’ शहर


उत्तर प्रदेशमधील कनौज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये अत्तरांची नगरी म्हणून ओळखले जाते. आपण जिथे आज जुनी शहरे, इतिहास विसरून आधुनिकतेचा आधार घेत आहोत. कनौज मात्र आजही मातीपासून अत्तर तयार करण्याची आपली 500 वर्षांपूर्वीची परंपरा निस्वार्थीपणाने निभावत आहे. आपल्यासोबत सुगंध घेऊनच कनौजमधील हवाही चालते, असे म्हटले जाते. मोठ्या प्रमाणावर अत्तराचा व्यापार या शहरामध्ये चालत असून जवळपास 200 पेक्षा अधिक अत्तराच्या फॅक्टरी येथे आहेत. मोठ्या प्रमाणावर यामध्ये अत्तर तयार करण्यात येते. अनेक शहरांमधून येथे अत्तर तयार करण्यासाठी फुले आणि लाकडांची आयात करण्यात येते.

या शहराबाबत अनेक अनेक लोक असे सांगतात की, जेव्हा कनौजच्या मातीवर पावसाच्या पाण्याचे थेंब पडतात. तेव्हा एक वेगळाच सुगंध या मातीमधून येतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अत्तर कनौजमधील मातीपासूनही तयार करण्यात येते. माती यासाठी ताब्याच्या भांड्यांमध्ये भाजली जाते. त्यानंतर बेस ऑइलसोबत मातीमधून येणारा गंध एकत्र करण्यात येतो. अशाप्रकारे मातीपासून अत्तर तयार करण्यात येते. कनौजमध्ये जगभरातील सर्वात महाग अत्तर तयार करण्यात येते. अस्वस्थता आणि तणाव दूर करण्यासाठी येथील अत्तराचा गंध अनेक लोक घेतात. पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांपासून कनौजमधील अत्तर तयार करण्यात येते. अल्कोहोलचा वापर यामध्ये करण्यात येत नाही.

कनौजमध्ये जगातील सर्वात स्वस्त अत्तरापासून सर्वात महाग अत्तरांपर्यंत सर्व प्रकारची अत्तर तयार करण्यात येतात. ‘अदरऊद’ हे येथे तयार करण्यात येणाऱ्या अत्तरांपैकी सर्वात महागडे अत्तर आहे. आसामधील खास लाकडापासून हे अत्तर तयार करण्यात येते. जवळपास 5000 रूपये या एक ग्राम अत्तराची किंमत आहे.

यूके, यूएस, सौदी अरेबिया, ओमन, इराक, इरान समावेत अनेक देशांमध्ये कनौज येथे तयार करण्यात येणाऱ्या अत्तराची निर्यात करण्यात येते. कॉस्मेटिकसोबतच गुटखा आणि पान मसाल्यामध्येही अत्तराचा वापर करण्यात येतो.

Leave a Comment