शत्रूचा कर्दनकाळ, इंडिअन आर्मीची गोरखा रेजिमेंट


भारताच्या सुरक्षेसाठी चोवीस तास दक्ष असलेल्या भारतीय लष्कराच्या सर्व रेजिमेंट कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करण्यासठी सदैव सज्ज आहेतच पण त्यातही २०४ वर्षाच्या जुन्या गोरखा रेजिमेंटचा दरारा शत्रूना जरा अधिक आहे. लढाईची वेळ आलीच तर शत्रू गोरखा रेजिमेंट बरोबर लढण्याची वेळ येऊ नये अशी प्रार्थना करतात अशी या रेजिमेंटची ख्याती आहे. त्यामुळे ही रेजिमेंट शत्रूचा काळ मानली जाते आणि लष्कराच्या खतरनाक रेजिमेंट मध्ये अग्रणी मानली जाते.


देशच्या कुठल्याच शत्रूवर या रेजिमेंटमधील जवान दया माया दाखवीत नाहीत. शत्रूला निर्दयपणे ठार करणारी आणि म्हणून शत्रू सैनिकांना नको असलेली ही रेजिमेंट २४ एप्रिल १८१५ साली स्थापली गेली. म्हणजे आता ती २०४ वर्षांची आहे. त्यावेळी ब्रिटीश इंडिअन आर्मीसाठी ही रेजिमेंट काम करत असे. यात प्रामुख्याने नेपाळी गोरखा जवानांची भरती केली जाते.


या जवानांना अतिशय कडक प्रशिक्षण दिले जाते. असे म्हटले जाते की जर कुणी तुम्हाला तो मृत्यूला घाबरत नाही असे सांगत असेल तर तो एकतर खोटे बोलणारा असतो किंवा गुरखा जवान असतो. आणि देशाच्या इतिहासात अनेकदा गोरखा जवानांनी हे सिद्ध केले आहे.


नेपाळी मध्ये एक म्हण आहे, कायर हुनु मार्नु राम्रो याचा अर्थ भीतीचे आयुष्य जगण्यापेक्षा मरण पत्करणे चांगले. याच सिद्धांतावर गोरखा रेजिमेंटचे काम चालते. शत्रूसाठी काळ असलेले हे जवान दया माया असले शब्द त्यांच्या कोशात ठेवतच नाहीत. शत्रूशी बहादुरीने मुकाबला करणे ही या जवानांची खासियत. गोरखा त्यांच्यातील अदम्य हिमतीसाठी ओळखले जातात. ते कुणालाच घाबरत नाहीत. शत्रूसाठी अति क्रूर असलेले हे जवान त्याला जिवंत सोडत नाहीत. त्याच्याकडे कुकरी नावाचे एक खास हत्यार असते. हा एक प्रकारचा चाकू आहे आणि तो कुणाचाही जीव घेण्यास सक्षम आहे.

गोरखा साथीदारांचे मनोबल वाढविण्यासाठी जय महाकाली, आयो गोरखाली असा नारा देतात. गोरखा रेजिमेंट मध्ये अन्य भागातील जे लष्करी अधिकारी असतात त्यांना गोरख्यांची भाषा शिकून घ्यावी लागते कारण त्यामुळे ते जवानांशी अधिक चांगला संवाद साधू शकतात.

Leave a Comment