माणसाचा पूर्वज मानला जातो हिममानव


पृथ्वीवर हिममानवाचे अस्तित्व खरोखर आहे का नाही याबाबत नेहमीच वाद आणि चर्चा होत असतात. मात्र भारतीय पुराणे, रामायण, महाभारत अश्या अनेक ग्रंथामध्ये हिममानव किंवा ज्याला यती म्हटले जाते त्याचे अनेक उल्लेख आढळतात. हनुमानासाठी जती असा शब्द वापरला जातो तो यतीचा अपभ्रंश आहे. म्हणजे हनुमान हा यतीचेच रूप आहे असे मानले जाते व त्यामुळे हिममानव हा माणसाचा पूर्वज मानला जातो. भारतीय लष्कराच्या पर्वतारोही अभियान दलातील जवानांनी हिमालयात हिममानवाची पाउले दिसल्याचे फोटो नुकतेच प्रसिद्ध केले आणि पुन्हा एकदा हा माणसाचा पूर्वज चर्चेत आला आहे.

हिममानव किंवा यतीवर अनेक संशोधकांनी शोध घेतला आहे आणि अनेकांनी त्याचे फोटो प्रसिध्द केले आहेत मात्र त्याचा अस्तित्वाचे ठोस पुरावे कुणीही देऊ शकलेला नाही. कारण काही संशोधकांच्या मते ते तपकिरी रंगाचे महाप्रचंड अस्वल होते आणि ही प्रजाती हिमालयात आढळते. या प्रजाती वास्तविक ध्रुवीय प्रदेशात होत्या आणि ४० हजार ते १ लाख २० हजार वर्षापासून त्यांचे अस्तित्व आहे. अन्य वैज्ञानिकांच्या मते ते वानरासारखे आहेत आणि माणसासारखे ताठ उभे चालतात.


सर्वप्रथम यती पहिल्याची नोंद १९२५ साली केली गेली होती. एका जर्मन फोटोग्राफरने या हिममानवाचे फोटो काढले होते. त्यानंतर १९५३ मध्ये एव्हरेस्ट सर करणारे सर एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टवर हिममानवाच्या पायाचे ठसे पहिल्याचा दावा केला होता मात्र नंतर हिलरी यांनी तो दावा मागे घेतला होता. भारत, नेपाल आणि तिबेट याच भागात हिममानवाचे वास्तव्य असते असाही दावा केला जातो. २००८ आणि २०१० मध्ये चीनजवळच्या तिबेट मधील रिमोट भागात हिममानव फिरताना पाहिल्याचे व त्याला पकडण्यात आल्याचे सांगितले जात होते.


गिर्यारोहक स्टीव्ह बॅरी यांच्या संदर्भातील एका अहवालात पश्चिम भूतानच्या सर्वात उंच पहाडावर गाग्स्वार पुनसम येथे एका यतीचा फोटो काढल्याचा उल्लेख आहे. तसेच एका ११ वर्षाच्या गुराख्याने तपकिरी रंगाचा अंगभर केस असलेला हिममानव पहिल्याचा दावा केला होता. हे यती किंवा हिममानव महाप्रचंड असतात असा समज आहे. भारतीय सेना जवानांनी जे ३ फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत त्यात या पावलांचा आकार ३२ बाय १५ इंच असल्याचे म्हटले आहे. त्यावरून खरोखरच तो यती असेल तर त्याचा आकार काय असेल याची कल्पना येऊ शकेल.

Leave a Comment