नवी दिल्ली – शुक्रवारी मध्यरात्री निधन महान धावपटू मिल्खा सिंग यांचे झाले. मिल्खा सिंग यांची प्राणज्योत उपचार सुरू असतानाच मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश हळहळला. त्यांना सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमांतून श्रद्धांजली अपर्ण केली जात असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत अभिवादन केले. पण, राहुल गांधी श्रद्धांजलीपर केलेले हे ट्वीट वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरले. ट्वीटमध्ये वापरलेल्या एका इंग्रजी शब्दावर आक्षेप घेत अनेकांनी राहुल गांधींची थट्टा केली.
He की Her इंग्रजी शब्दांवरून ट्रोल झाले राहुल गांधी
राहुल गांधी मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर ट्वीट करत म्हणाले, मिल्खा सिंगजी फक्त प्रसिद्ध क्रीडापटूचं नव्हते. लवचिकता आणि समपर्ण यासाठी ते लाखो भारतीयांचे प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवारांच्या दुखात मी सहभागी आहे. भारत नेहमीच आपल्या फ्लाईंग शिखचे स्मरण करत राहिल, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
Shri Milkha Singh ji was not just a sports star but a source of inspiration for millions of Indians for his dedication and resilience.
My condolences to his family and friends.
India remembers her #FlyingSikh pic.twitter.com/dE70KmiQJz
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 19, 2021
राहुल गांधींच्या या ट्विटमधील शेवटचे वाक्य India remembers her #FlyingSikh असे म्हटले आहे. Her हा शब्द या वाक्यात वापरलेला असून, त्यावरून अनेकांनी राहुल गांधी यांच्या इंग्रजीबद्दलच्या ज्ञानाची थट्टा उडवली आहे. India हा शब्द पुल्लिंगी असून, he ऐवजी her वापरल्याचे सांगत राहुल गांधींनी भारत शब्दाचे जेंडर बदलल्यांचे अनेकांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटनंतर भारताचे जेंडर काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पण, देशाचे लिंग निश्चित करता येत नाही. हे देशातील सामाजिक मान्यतेवरच ठरते. इंग्रजीत देशाचा उल्लेख करायचा झाल्यास मदरलँड (motherland) असा केला जातो. पण जर्मनीत फादरलँड असा उल्लेख केला जातो. भारत वा इंडिया या शब्दांचे असे कोणतेही जेंडर निश्चित नाही. भारताविषयी बोलताना अनेकवेळा भारतमाता या आशयानेच उल्लेख केला जातो.
दिल्ली विद्यापाठाशी संलग्नित असलेल्या मैत्रैयी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. सविता पाठक यांनी याबद्दल आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, भारतात जगातील इतर देशांपेक्षा वेगळ्या गोष्टींना समाजमान्यता आहे. दुसऱ्या राष्ट्रात देशाचे नाव घेताना फादरलँड अशा आशयाने घेतले जाते, तर भारतात मदरलँड (मातृभूमी) या आशयाने म्हटले जाते. त्यामुळे इंडिया असा उल्लेख करायचा झाल्यास मदर इंडिया होते आणि त्यामुळे Her शब्दप्रयोगच योग्य ठरतो.