पायी वारीवरुन गोपिचंद पडळकर आक्रमक; सरकारने विरोध केला तरी वारी होणार


पंढरपूर : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे वारकरी संप्रदायात संभ्रम वाढला आहे.

राज्यातील सरकार दारू दुकाने सुरु करताना बैठक घेत नाही, बार सुरु करताना बैठक घेत नाही. र बहुजन समाजाची शेकडो वर्षाच्या वारी परंपरेसाठी सारख्या बैठक घेते आणि शेवटी परवानगी नाकारते अशा शब्दात राज्यातील ठाकरे सरकारला निशाणा करीत वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. हे सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचे घेतात, काम मात्र औरंगजेबाचे करतात, असा टोला लगावला.

कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी वारकरी तयार असतानासुद्धा हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालत आहे? असा सवाल करत काही वारकरी 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात करणार आहे. आपणही एक दिवस यात सामील होणार असल्याचे सांगताना आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारी यात सहभागी होणार असा संदेश सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.