मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणवरील बंदी बीसीसीआयने उठवली


मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणवर लावण्यात आलेली बंदी अखेर बीसीसीआयने उठवली आहे.

त्याचा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. अंकित 2013 साली झालेल्या आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती.

2013 सालच्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्‍सिंग झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या अंकित चव्हाण, एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्रीशांतवरील बंदी काही दिवसांपूर्वी मागे घेतली गेली होती व त्यानंतर अंकितनेही बंदी मागे घेण्याची विनंती केली होती.