मोटोरोलाच्या रफ अँड टफ स्मार्टफोनची फिचर्स लिक

मोटोरोलाने मागच्या काळात बजेट आणि मिडरेंज मधील अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत आणि भारतात मोटो जी सिरीजने चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोटोरोला आणखी एक रफ अँड टफ स्मार्टफोन मोटोरोला डिफाय रग्ड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा मजबूत आणि दणकट फोन खास फिचर्ससह येत आहे. त्याची स्पेसिफिकेशन्स आणि डिझाईन लिक झाले आहे. हा मिलिटरी ग्रेड मजबुतीवाला फोन आहे असे समजते.

हा फोन साबण किंवा कीटकनाशकाने धुता येणार आहे. गुगल प्ले कन्सोल आणि गिकबेंच लिस्टिंगवर तो मोटो अथेना कोड नावाने पाहिला गेला आहे. हा फोन आयपी ६८ सर्टिफाईड, डस्ट, वॉटरप्रूफ आहे. टिप्सटर इव्हान ब्लास याने ट्विटरवर इमेज शेअर केली आहे. हा फोन व्हायब्रेशन, ह्युमिडीटी, सॉल्ट, मिस्ट रेझिस्टन्स सर्टिफिकेट सह येईल. तो उणे ३० ते ७५ डिग्री तापमान सहन करू शकेल असे सांगितले जात आहे.

या फोनला ६.५ इंची एचडी डिस्प्ले, कॉर्निंग गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन असून दोन मीटर उंचीवरून तो पडला तरी तुटणार नाही. त्याला अँड्राईड १० ओएस, ४ व ६ जीबी रॅम, ६४ व १२८ जीबी स्टोरेज आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी असेल. सेल्फी साठी ८ एमपीचा फ्रंट तर रिअरला ४८ एमपी प्रायमरी कॅमेरा ट्रिपल सेट सह असेल.