करोना संकटकाळातही मोदींची लोकप्रियता जगात सर्वाधिक

करोना संकट काळात सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगात सर्वाधिक प्रसिद्ध नेते अशीच आहे. अमेरिकेच्या डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टतर्फे केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणात मोदी जगातील अन्य देशांच्या नेत्यांपेक्षा लोकप्रियतेत खुपच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

नरेंद्र मोदी यांचे ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग ६६ टक्के असून ते अमेरिका, रशिया, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, ब्राझील, जर्मनी सह १३ देशातील नेत्यांपेक्षा अधिक आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींच्या ग्लोबल अॅप्रूव्हल रेटिंग मध्ये थोडी घसरण झाली असली तरी ते टॉपवरच आहेत. अन्य जागतिक नेत्यांच्या तुलनेत मोदी यांची कामगिरी सरस ठरली आहे.

या यादीत दोन नंबरवर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्के, तीन नंबरवर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोप्से ओब्रेडोर ६३ टक्के रेटिंग सह आहेत. चार नंबरवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन ५४ टक्के, जर्मनी चान्सलर अन्जेला मर्केल ५३ टक्के रेटिंग सह पाच नंबरवर आहेत. अमेरिकेचे बायडेन सहा नंबरवर, कॅनडाचे जस्टीन टुडो ४८ टक्के रेटिंग सह सात नंबरवर, युकेचे बोरीस जॉन्सन ४४ टक्के रेटिंग सह आठ नंबरवर, द.कोरियाचे मून जे इन ३७ टक्के रेटिंग सह ९ नंबरवर तर स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ १० नंबरवर आहेत.

डेटा इंटेलीजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्ट ही रिसर्च कंपनी सातत्याने जगभरातील नेत्यांचे अॅप्रूव्हल रेटिंग ट्रॅक करत असते.