सीरममध्ये जुलै महिन्यात मुलांसाठी Novavax लसीच्या चाचणीस सुरूवात होण्याची शक्यता


पुणे – लहान मुलांवर Novavax लसीची चाचणी घेण्याची योजना पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम संस्था आखत असल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी दिली आहे. सीरम संस्था जुलै महिन्यात मुलांवर Novavax लसीची चाचणी घेऊ शकते. एएनआयने म्हटले आहे की, सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी Novavax कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा सीरम संस्था करत आहे.

दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने दावा केली आहे की, त्यांची लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत २०० कोटी लस निर्मिती केली जाणार होती.