‘या’ ११ खेळाडूंसह मैदानात उतरु शकते टीम इंडिया


साउथॅम्प्टन- उद्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. हा सामना इंग्लंडच्या साउथॅम्प्टनमधील एजियास बाउल मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी खास रणनिती तयार केली आहे. पण क्रीडाप्रेमींमध्ये कोणते ११ खेळाडू मैदानात उतरतील याबाबत उत्सुकता आहे. कोण आत?, कोण बाहेर? याबाबत तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत.

सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानात उतरेल. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी येईल. त्यानंतर कर्णधार विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर. अश्विन, नवव्या क्रमांकावर मोहम्मद शमी, दहाव्या क्रमांकावर इशांत शर्मा आणि अकराव्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असेल.

कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासन मोहम्मद सिराजला या संघात स्थान देण्यासाठी आग्रही आहे. पण त्याला संघात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज आला आहे.

न्यूझीलंडकडून सलामीला टॉम लॉथम, डॅवोन कोनवे ही जोडी येईल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार केन विलियमसन, चौथ्या क्रमांकावर रॉस टेलर, पाचव्या क्रमांकावर विल यंग फलंदाजीसाठी येतील. तर सहाव्या स्थानावर यष्टीरक्षक फलंदाज वीजे वाटलिंगल मैदानात उतरेल. वाटलिंगचा हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. सातव्या क्रमांकावर कायल जेमिसन, आठव्या क्रमांकावर एजाज पटेल, नवव्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट, दहाव्या क्रमांकावर टिम साउथी आणि अकराव्या क्रमांकावर नील वॅगनर मैदानात उतरेल.

दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू
भारत- रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड- टॉम लॉथम, डॅवोन कोनवे, केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, विल यंग, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), एजाज पटेल, कायल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउथी आणि नील वॅगनर