आताच्या काळात सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणे हे काही नविन राहिलेले नाही. पण आजही सेलिब्रिटी जेव्हा न्यूड फोटो शेअर करतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडते. टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर हिने नुकतेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर तिच्या या न्यूड फोटोने धुमाकुळ माजला आहे. पण तिने केलेल्या या फोटोशूटवर ‘फॅशन कॉपी’चा आरोप करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर शमा सिकंदरच्या ‘त्या’ फोटोचा धुमाकुळ
केवळ आपल्या लूकसाठीच नव्हे तर बोल्ड अंदाजासाठी देखील टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर ही कायम चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते. ती एका न्यूड फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शमाने एक न्यूड फोटो शेअर केला आहे. हा फोटो अभिनेत्री शमा सिकंदर हिने न्यूयॉर्कमधून शेअर केला आहे. तिचा बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत ती सध्या क्वालिटी टाइम घालवत आहे.
शमा या फोटोमध्ये तिच्या घराच्या एका खिडकीला पाठ टेकवत, नजर खाली झुकवत पोज देताना दिसून आली. ती फोटोत एका मोठ्या आकाराच्या टोपीने आपले शरीर लपवत असल्याचे दिसून येत आहे. व्हाइट बॅकड्रॉप आणि खुल्या केसांमुळे या अभिनेत्रीच्या लुकमध्ये आणखी ग्लॅमर झळकताना दिसत आहे. या फोटोला शेअर करत शमाने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने ‘हॅट का मौसम है’ असे लिहित आपला हॅपी मूड चाहत्यांसोबत शेअर केला आहे.